मौजे सुकेणे कोरोनामुक्त, तर कसबे सुकेणे कोरोनामुक्तीच्या दिशेने

Corona
Corona File photo

कसबे सुकेणे (जि. नाशिक) : मौजे सुकेणे (ता. निफाड) गाव पूर्णपणे कोरोनामुक्त झाले असून, शेजारीच तालुक्यातील पाच नंबरचे मोठे असलेले कसबे सुकेणे गावदेखील कोरोनामुक्तीच्या वाटेवर दिसत आहे. मौजे सुकेणे येथे एकूण १५२ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. त्यापैकी १५१ रुग्ण पूर्णपणे बरे झाले असून, केवळ एकाच रुग्णाचा मृत्यू झाला. म्हणजेच येथील बरे होण्याचे प्रमाण ९९.०३ टक्के, तर आजमितीस गावांमध्ये एकही कोरोना रुग्ण नाही, अशी माहिती सरपंच सुरेखा चव्हाण व उपसरपंच सचिन मोगल यांनी दिली. (Corona patients are declining at Kasbe Sukene)

शेजारीच असलेल्या कसबे सुकेणे येथे आतापर्यंत ४८३ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. त्यापैकी ४५९ रुग्ण बरे होऊन घरी परतले असून, २१ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. येथील बरे होण्याचे प्रमाण ९५.०३ टक्के असून, आजमितीस येथे केवळ तीनच रुग्ण ॲक्टिव्ह असून, ते देखील गृहविलगीकरणात उपचार घेत आहे. येत्या दोन ते तीन दिवसांत या रुग्णांचे विलगीकरण संपणार आहे. एवढे मोठे गाव असतानाही ग्रामपंचायत प्रशासन, कोरोना कमिटी व प्राथमिक आरोग्य केंद्राने यशस्वी नियोजना केल्यानेच हे शक्य झाल्याची माहिती सरपंच गीता गोतरणे, उपसरपंच धनराज भंडारे व ग्रामसेवक रवी अहिरे यांनी दिली.

Corona
नाशिक जिल्ह्यात यंदा ११ लाख रोपांच्या लागवडीचे नियोजन

येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या माध्यमातून १३ मार्चपासून लसीकरणाला प्रारंभ झाला असून, आतापर्यंत ५८३७ लस उपलब्ध झाल्या. त्यापैकी पहिला डोस घेणाऱ्यांची संख्या ५०८१ तर, दुसरा डोस घेणाऱ्यांची संख्या ७५६ इतकी नोंदवली गेली. एकंदरीत निफाड तालुक्यातील लोकसंख्येने मोठे व पंचक्रोशीतील मोठी बाजारपेठ असतानाही कोरोनामुक्तीच्या मार्गावर असल्याने पंचक्रोशीतून कसबे सुकेणे ग्रामपंचायत प्रशासन, कोरोना कमिटी, प्राथमिक आरोग्य केंद्राच्या सर्व पदाधिकारी व कर्मचाऱ्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.

कसबे सुकेणे येथील आरोग्य केंद्राच्या माध्यमातून कोविड लस अभियान यशस्वीपणे राबवले गेल्याने व या लसीकरणास नागरिकांचा उत्तम प्रतिसाद मिळाल्याने पंचक्रोशी कोरोनामुक्तीच्या वाटेवर आहे.

- डॉ. वैभव पाटील, आरोग्य अधिकारी, प्राथमिक आरोग्य केंद्र

ग्रामपंचायत प्रशासन व कर्मचाऱ्यांचे उत्तम नियोजन, प्राथमिक आरोग्य केंद्राची मिळालेली साथ व गावातील व्यावसायिक व नागरिकांचे उत्तम मिळालेले सहकार्य यामुळेच कोरोनावर आम्ही मात करू शकलो.

- गीता गोतरणे, सरपंच, कसबे सुकेणे

Corona
नाशिकमध्ये सकल मराठा समाजातर्फे गुप्त बैठका?

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com