Corona Update : NMC ॲक्शन मोडमध्ये! कोविडची सध्या कुठलीही भीती नाही | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

NMC News

Corona Update : NMC ॲक्शन मोडमध्ये! कोविडची सध्या कुठलीही भीती नाही

नाशिक : शहरामध्ये कोविडची सध्या कुठलीही भीती नसली तरी महापालिकेची यंत्रणा ॲक्शन मोडमध्ये आली आहे. केंद्र सरकारने कोविडच्या पार्श्वभूमीवर आढावा घेताना महापालिकेला सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यानुसार महापालिकेच्या वतीने कोविडच्या पहिल्या, दुसऱ्या व तिसऱ्या लाटेत केलेल्या सुविधांचा आढावा घेताना सज्जता केली आहे. (Corona Update NMC In Action Mode no fear of covid at present nashik news)

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महापालिकेने वाढविल्या चाचण्या

कोविडच्या पार्श्वभूमीवर रविवारी केंद्र सरकारच्या आरोग्य मंत्रालयाच्या वतीने देशभरातील एक हजार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रतिनिधींशी तयारी संदर्भात आढावा घेण्यात आला. कोविड संदर्भात सध्या भारतात भीती नसली तरी तयारीत राहण्याच्या सूचना देण्यात आल्या. त्या अनुषंगाने नाशिक महापालिकेच्या वतीने सज्जता ठेवण्यात आली आहे.

महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये तपासणीसाठी येणाऱ्या रुग्णांची चाचणी घेण्यास सुरवात करण्यात आली आहे. केंद्रांवर चाचण्या वाढविण्यात आल्या आहेत. परदेशातून येणाऱ्या नागरिकांच्या जिनोम सिक्वेन्सदेखील केले जाणार आहे. कोविडकाळात महापालिकेने सर्व रुग्णालय कोविड म्हणून घोषित केली होती. रुग्णांची संख्या झपाट्याने घटल्यानंतर नियमित तपासणी सुरू झाली.

हेही वाचा : Love Jihad: प्रेमाला धर्म आहे...?

हेही वाचा: Nashik News : जायखेड्यातील जवानाचा आसाममध्ये मृत्यू

शहरात ९६ टक्के लसीकरण

नाशिक शहरामध्ये १८ ते ४४ वयोगटांतील दोन डोस घेतलेल्या नागरिकांची संख्या ७६ टक्के आहे. ४० पेक्षा अधिक वय असलेल्या दुसरा डोस घेतलेल्या नागरिकांची संख्या ८१ टक्के आहे. पंधरा ते अठरा वयोगटांतील ५१ टक्के युवकांनी दोन डोस घेतले आहेत. बारा ते चौदा वयोगटांत दोन डोस घेणाऱ्यांचे प्रमाण ६५ टक्के आहे. शहरात २७ लाख २७ हजार २९५ डोस देण्यात आले आहे. असे सरासरी ९६ टक्के लसीकरण झाले आहे.

कोविडच्या पार्श्वभूमीवर महापालिकेचा आढावा

- एकूण बेडची उपलब्धता- १२,५००
- महापालिकेच्या रुग्णालयांमधील बेड - ८००
- शहरी आरोग्य केंद्र -३०
- ऑक्सिजन- १४६ टन आठ टाकी
- ड्युरा सिलिंडर- १९
- ऑक्सिजन सिलिंडर- ३०६०
- ऑक्सी कॉन्सन्ट्रेटर- १४००

हेही वाचा: Nashik News :...अन् चक्क गुलमोहराच्या झाडातून निघू लागलं पाणी!