esakal | नाशिक शहरात ऊसनवारीच्या लसींचाही तुटवडा; मोहिमेला सलग 2 दिवस ब्रेक

बोलून बातमी शोधा

Corona vaccinations

नाशिक शहरात ऊसनवारीच्या लसींचाही तुटवडा; मोहिमेला सलग 2 दिवस ब्रेक

sakal_logo
By
विक्रांत मते

नाशिक : महापालिकेने जिल्हा परिषदेकडून घेतलेल्या साडेअकरा हजार लसी देखील संपुष्टात आल्याने शनिवारपासून शहरात लसीकरण बंद झाले आहे. लसीकरण मोहिमेत महापालिकेने प्रथमच शनिवार व रविवार असे दोन दिवस लसीकरण बंद ठेवत असल्याचे जाहीर केले. लस कधी प्राप्त होईल, याबद्दल अद्याप अनिश्चितता असल्याने लसीकरणाच्या मोहिमेला मोठा ब्रेक लागला आहे.

महापालिकेच्यावतीने शहर व परिसरात १६ जानेवारीपासून लसीकरणाच्या मोहिमेला सुरुवात झाली शहरात महापालिकेला मोठ्या प्रमाणात कोव्हीशिल्ड व त्यानंतर कोव्हाक्सींचे डोस मिळाले. कोव्हीशिल्डचे सुमारे सव्वा दोन लाखापेक्षा अधिक तर कोव्ह्याक्सीचे ४० हजारापेक्षा अधिक डोस प्राप्त झाले. राज्याच्या आरोग्य संचालनालयाकडून नाशिक जिल्हा म्हणून लस प्राप्त होते. जिल्हा रुग्णालयात लस प्राप्त झाल्यानंतर शहर व ग्रामीण असे वर्गीकरण केले जाते. महापालिकेला आत्तापर्यंत दोन लाख ६० हजारांहून अधिक लसी प्राप्त झाल्या. त्यातील सर्व लस गुरुवारी संपुष्टात आल्याने जिल्हा परिषदेकडून सुमारे साडेअकरा हजार लसींची डोस उसनवरीने घेण्यात आले.

हेही वाचा: मुंबईहून उत्तर प्रदेशात निघालेल्या तरुणांवर काळाचा घाला; चौघे जागीच ठार

गुरुवार व शुक्रवारी असे दोन दिवसात लस संपुष्टात आल्याने शनिवारी महानगरपालिकेने लसीकरण मोहीम बंद केली. शनिवार नंतर रविवारी लस प्राप्त होणे अपेक्षित होते. मात्र त्यापूर्वीच महानगरपालिकेने लस प्राप्त न झाल्याने लसीकरण होत नसल्याचे जाहीर केले. दोन दिवस सलग लसीकरण बंद असल्याने नागरिकांना माघारी फिरावे लागले. शासनाच्या ॲप वर लसीकरणाची नोंद करूनही डोस शिल्लक नसल्याचे मेसेज मोबाईलवर प्राप्त झाले. लस कधी मिळेल, पुन्हा कधी मोहीम सुरू होईल, याबद्दल महापालिकेसह ग्रामीण भागातील आरोग्य यंत्रणा देखील संभ्रमीत असल्याचे दिसून आले.

हेही वाचा: आरोग्य सांभाळा! नाशिकमध्ये चालता-बोलता होतायेत मृत्यू; दिवसभरात ५ घटना