esakal | मुंबईहून उत्तर प्रदेशात निघालेल्या तरुणांवर काळाचा घाला; चौघे जागीच ठार
sakal

बोलून बातमी शोधा

accident at zodge

मुंबईहून उत्तर प्रदेशात निघालेल्या तरुणांवर काळाचा घाला; चौघे जागीच ठार

sakal_logo
By
दीपक देशमुख

झोडगे (जि. नाशिक) : लाॅकडाऊनच्या भितीने अनेक परराज्यातील प्रवासी मिळेल त्या वाहनाने रात्रीचा प्रवास करून आपले गाव गाठण्याचा प्रयत्न करत आहेत. वाढत्या उन्हामुळे रात्री उशिरापर्यंत प्रवास करण्याचा त्यांचा प्रयत्न दिसतो. हा प्रयत्न त्यांच्या जीवावर बेतला आहे.

मृतांमध्ये सर्व 35 ते 40 वयाचे

राष्ट्रीय महामार्गावरील देवारपाडे फाटाजवळील हाँटेल साई कार पार्किंग ढाबा समोर पहाटे तीन वाजेच्या दरम्यान . मुंबई येथून उत्तर प्रदेश राज्याकडे जाणारी मारूती अल्टो कार आणि धुळ्याकडून मालेगावकडे जाणारा मातीने भरलेला डंपर ट्रक यांच्यात भीषण अपघात होऊन कार मधील चार तरूण जागीच ठार झाले. तर एक प्रवासी गंभीर जखमी झाला. जखमीला उपचारासाठी मालेगाव येथे दाखल करण्यात आले आहे. मृतांमध्ये सर्व उत्तर प्रदेश राज्यातील असून पस्तीस ते चाळीस वयोगटातील तरूण आहेत. मुंबई येथे कंपनीमध्ये काम करत होते.

हेही वाचा: कोरोना काळात 'या' कंपनीत मात्र घसघशीत पगारवाढ!

कारवाईच्या भीतीने करतात रात्रीचा प्रवास

अपघातग्रस्त कार मधील प्रवाशांचे नांवे कळू शकले नाही. त्यांचे नातेवाईक येथे दाखल झाल्यावर अधिक माहिती उपलब्ध होईल. घटनास्थळी मालेगाव तालुका पोलिस स्टेशनचे कर्मचारी दाखल होऊन अपघात ग्रस्त वाहने क्रेनच्या साहाय्यने बाजूला करून व मृत्यू व जखमींना मदत कार्य केले.

हेही वाचा: राहत्या घरातून अचानक नवविवाहित बेपत्ता; काय घडले त्या रात्री?

loading image