esakal | कोणी लस घेता का लस! मुबलक साठा उपलब्ध झाल्याने प्रशासनाचे नागरिकांना साकडे
sakal

बोलून बातमी शोधा

Corona Vaccination

कोणी लस घेता का लस! प्रशासनाचे नागरिकांना साकडे

sakal_logo
By
प्रमोद दंडगव्हाळ

सिडको (जि. नाशिक) : सध्या सिडकोसह शहरातील लसीकरण केंद्रावर (Vaccination center) मोठ्या प्रमाणात लस उपलब्ध होऊ लागल्याने आता केंद्र चालकावर ‘कोणी लस घेता का लस’, अशी म्हणण्याची वेळ आली आहे. त्यामुळे ‘नाथांच्या घरची उलटी कहाणी’ असला काहीसा गमतीदार प्रकार यानिमित्त लसीकरण केंद्रावर नागरिकांना बघायला मिळत आहे. याबाबत नागरिकांत चांगलीच चर्चा रंगली आहे.

आधी लस देता का, आता लस घेता का...?

गेल्या दोन वर्षापासून संपूर्ण जगात कोरोनाने (Corona) अक्षरशः हाहाकार माजविला होता. यापासून वाचायचे असेलतर त्यावर केवळ लस हाच एकमेव पर्याय होता. दीर्घ प्रतीक्षेनंतर लसदेखील बाजारात आली. सुरवातीला लशीबद्दल भीती, तर नंतर लस घेण्यासाठी नागरिकांच्या अक्षरशः काही किलोमीटर अंतराच्या रांगा लागल्याचे बघायला मिळाले. आपल्याला लसीकरण केंद्र मिळावे म्हणून लोकप्रतिनिधी प्रशासनाशी भांडू लागले. नंतर लस मिळाली म्हणून नागरिक लोकप्रतिनिधींशी भांडू लागले. यानंतर मोठ्या प्रमाणात वशिलेबाजी सुरू झाली. याकरिता थेट मंत्री, खासदार, आमदार, नगरसेवक आदींचे प्रतिष्ठित लोकांचे फोन येऊ लागले.

हेही वाचा: ऑक्सिजन निर्मितीत राज्यात नाशिकचा प्रथम क्रमांक - छगन भुजबळ

सुरवातीला केवळ ७०, ८०, ९० एवढ्या कमी प्रमाणात केंद्रावर लस उपलब्ध होताना दिसून आल्या. ‘मी लस घेतली.. आपणही घ्या’, असे आवाहन करत सिलेब्रिटी व लोकप्रतिनिधी आपले फोटो व्हायरल करू लागले. नंतर आठ-दहा दिवसांनी लस येऊ लागल्या. त्यामुळे पहिल्या व दुसऱ्या लसीमध्ये मोठे अंतर निर्माण झाले. दुसऱ्या लशीमध्ये ४५ ऐवजी ८४ दिवसांचे अंतर ठेवण्यात आले. कोणी लस देता का लस’ अशी म्हणण्याची वेळ नागरिकांवर आली. कालांतराने मोठ्या प्रमाणात लस उपलब्ध होऊ लागली. आज सध्या लस घ्या म्हणून केंद्र चालकांना फोन करून सांगावे लागते आहे.

हेही वाचा: CoWIN चे नवीन फिचर! लसीकरण झाले की नाही समजणार

loading image
go to top