नगरसेविकेने हळदी-कुंकूनिमित्त चक्क सोन्याच्या अंगठ्याच वाण म्हणून दिल्या

नाशिक महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदारांना मोहित व संमोहित करण्यासाठी उमेदवारांचे सध्या सर्वदूर वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम सुरू आहेत.
Golden Ring
Golden RingSakal

सिडको - नाशिक महापालिका निवडणुकीच्या (Nashik Municipal Election) पार्श्वभूमीवर मतदारांना (Voters) मोहित व संमोहित करण्यासाठी उमेदवारांचे (Candidate) सध्या सर्वदूर वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम सुरू आहेत. सिडको परिसरात शिवसेनेच्या एका नगरसेविकेने (Corporator) हळदी कुंकूनिमित्त (Haldi Kunku) चक्क सोन्याच्या अंगठ्या (Golden Ring) वाण (Van) म्हणून देण्याची ‘कल्पना’ लढवली. आगामी मनपा निवडणुकीत कोणत्याही परिस्थितीत ‘अजिंक्य’ राहण्यासाठी केलेल्या या प्रतापामुळे प्रभागातील महिला वर्गात सध्या या विषयावरून चर्चेला उधाण आले आहे.

Golden Ring
नाशिक प्रभाग ११ : आरक्षणामुळे प्रस्थापितांना विस्थापित होण्याची भीती

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदारांना आकर्षित करण्यासाठी उमेदवार ‘नाना’ प्रकारच्या क्लुप्त्या लढवताना दिसतात. नवीन वर्षानिमित्त कॅलेंडरचे वाटप, संक्रांतीनिमित्त हळदी कुंकूत वाण आणि आता प्रभागरचनेनंतर प्रभागफेरी काढून उमेदवारांनी पत्रकाचे वाटप सुरू केले आहेत. यात महिला लोकप्रतिनिधींनी तर हळदी कुंकवाच्या कार्यक्रमावर अधिक जोर दिल्याचे दिसून येत आहे. निवडणुकीच्या या पार्श्वभूमीवर महिलांना चांगल्या किमतीचे वाणही दिले जात आहे. परंतु, अशाच एका शांत व प्रेमळ स्वभावाच्या विद्यमान नगरसेविकेने हळदी-कुंकूनिमित्त चक्क सोन्याच्या अंगठ्याच वाण म्हणून दिल्याच्या चर्चेला आता उधाण आले आहे. ज्या महिलांना हे वाण मिळाले नाही, त्यांच्या चेहऱ्याची अक्षरशः ‘चुंभळ’ झाल्याचे बघायला मिळाले. असे असले तरी मात्र या प्रकारामुळे सोन्याच्या अंगठ्यावाटप करणारी ती महिला नगरसेविका नेमकी कोण, याबाबत नागरिकात कमालीची संभ्रमावस्था निर्माण झाली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com