नाशिक प्रभाग ११ : आरक्षणामुळे प्रस्थापितांना विस्थापित होण्याची भीती

एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या या प्रभागात राष्ट्रवादी काँग्रेसने भगदाड पाडले. राष्ट्रवादी काँग्रेसचा जम बसत नाही, तोच भाजपने मुसंडी मारली. त्यानंतर शिवसेनेला येथे जम बसविता आला.
नाशिक प्रभाग ११ : आरक्षणामुळे प्रस्थापितांना विस्थापित होण्याची भीती
Summary

एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या या प्रभागात राष्ट्रवादी काँग्रेसने भगदाड पाडले. राष्ट्रवादी काँग्रेसचा जम बसत नाही, तोच भाजपने मुसंडी मारली. त्यानंतर शिवसेनेला येथे जम बसविता आला.

नाशिक - कधी काँग्रेस, (Congress) कधी राष्ट्रवादी काँग्रेस, (NCP) तर कधी भाजप-शिवसेना, (BJP-Shivsena) अशा सर्वच पक्षांना न्याय देणाऱ्या या प्रभागामध्ये यंदा पश्चिम विधानसभा मतदारसंघाच्या (Western Assembly Constituency) आमदार सीमा हिरे यांना मुलगी रश्मी हिच्या सोबतच भाजपचे संपूर्ण पॅनल निवडून आणावे लागणार आहे. आगामी विधानसभा निवडणुकीचा विचार करता महापालिकेच्या (Municipal) प्रभाग अकराची निवडणूक त्यांची कसोटी पाहणारी ठरेल, यात शंका नाही.

एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या या प्रभागात राष्ट्रवादी काँग्रेसने भगदाड पाडले. राष्ट्रवादी काँग्रेसचा जम बसत नाही, तोच भाजपने मुसंडी मारली. त्यानंतर शिवसेनेला येथे जम बसविता आला. मनसेलादेखील पाच वर्षे या प्रभागाने सांभाळले. त्यामुळे सर्व पक्षांना न्याय देणारा हा प्रभाग किंवा भाग आहे, असे म्हणता येईल. सन २०१७ च्या निवडणुकीत शिवसेनेचे एकमेव संपूर्ण पॅनल या भागातील नागरिकांनी निवडून दिले. त्याचे फलित म्हणून पाच वर्षे शिवसेनेकडे गटनेते पद कायम राहिले. यंदा मात्र प्रारूप प्रभागरचनेने या भागाचे सर्वच गणित बिघडवून टाकले. तीन सदस्यांच्या प्रभागात एक एससी, एक एसटी व एक महिला राखीव, असे आरक्षण पडल्यास विद्यमान नगरसेवकांना अन्यत्र शोधाशोध करावी लागेल. दोन आरक्षणे निश्चित असल्याने प्रस्थापित विस्थापित होण्याची दाट शक्यता आहे.

नाशिक प्रभाग ११ : आरक्षणामुळे प्रस्थापितांना विस्थापित होण्याची भीती
नाशिकसाठी व्हावे स्वतंत्र विद्यापीठ !

प्रभागाची व्याप्ती - गंगापूर गाव, आनंदवली, काळेनगर, संत कबीरनगर, सिरीन मेडोज, बळवंतनगर, सोमेश्वर परिसर.

उत्तर - गंगापूर गोवर्धन मनपा हद्दीपासून गोदावरी नदीच्या उजव्या तीराने पूर्वेकडे नवश्या गणपती मंदिर घेऊन शिवनगरच्या पश्चिम हद्दीपर्यंत तेथून दक्षिणेकडे मनपा घरकुल योजनेची इमारत घेऊन पाटील नेस्ट इमारतीपर्यंत तेथून पूर्वेकडे गिल्स रेसीडेन्सी इमारतीपर्यंत तेथून पश्चिमेकडे दगूनाना जाधव चाळीपर्यंत. पूर्वेकडे अशोक धुमाळ यांच्या घरापासून गंगाजल नर्सरीकडे जाणाऱ्या रस्त्याने दामोदर चौकापर्यंत तेथून पूर्वेकडे शंकरनगर रस्त्याने दक्षिणेकडील भाग घेऊन मधुर स्वीट समोरील रेड अॅपल ब्युटी सलून इमारतीपर्यंत.

पूर्व - नरसिंहनगर चौकापासून दक्षिणेकडे जेहान सर्कल ओलांडून पश्चिमेकडील परिसर घेऊन भोसला स्कूल गेटपर्यंत तेथून कॉलेज रोडने पूर्वेकडे मॉडेल कॉलनी यशवंत कॉलनी परिसर घेऊन मॉडेल कॉलनी चौकापर्यंत तेथून दक्षिणेकडे कॅनॉलवरील सायकल ट्रॅकपर्यंत तेथून ट्रॅकच्या हद्दीने पश्चिमेकडे महात्मानगर रोडपर्यंत तेथून दक्षिणेकडे पश्चिमेकडील भाग घेवुन ऋषभहोंडा शोरूमपर्यंत

दक्षिण - ऋषभहोंडा शोरूमपासून भोसला मैदानातून वनविहार कॉलनीतील आई बंगल्यापर्यंत व तेथून वनविहार कॉलनीच्या दक्षिण हद्दीने कामगारनगर कडे जाणाऱ्या रस्त्याने उत्तरेकडील भाग घेवुन मधुरमैत्री, श्रद्धाविहार, गुलमोहर कॉलनी घेऊन पाइपलाइन रोडपर्यंत तेथून उत्तरेकडे गणेशनगर पावेतो तेथून दक्षिणेकडे जाऊन एमआयडीसी हद्दीने सोमेश्वर कॉलनी घेऊन कॅनॉलपर्यंत तेथून पश्चिमेकडे कॅनॉल रस्त्याने शनी मंदिरापासून उत्तरेकडे दत्तात्रय इंगळे यांच्या घरापर्यंत तेथून रस्त्याने सुनील कर्पे यांच्या घरापर्यंत तेथून पश्चिमेकडे ध्रुवनगर नाला ओलांडून स. न. ६३ च्या हद्दीपासून दक्षिणेकडे कॅनॉल रोडपर्यंत तेथून पश्चिमेकडे कॅनॉल रस्त्याने कानेटकर उद्यानाजवळील गंगापूर - सावरगाव रोड मनपा हद्दीपर्यंत.

पश्चिम - गंगापूर - सावरगाव रोड मनपा हद्दीवरील उजवा तट कालव्यापासून शिवरस्त्याने उत्तरेकडे जाऊन गंगापूर रस्त्यापर्यंत तेथून गंगापूर रस्ता ओलांडून गंगापूर गोवर्धन शिवेने उत्तरेकडे जाऊन पूर्वेकडील भाग घेऊन गोवर्धन शिवेने गोदावरी नदीपर्यंत.

हे आहेत इच्छुक

विलास शिंदे, संतोष गायकवाड, रश्मी हिरे, वर्षा भालेराव, नयन गांगुर्डे, कविता गायकवाड, राधा बेंडकोळी, उषा बेंडकोळी, नानासाहेब कदम, गौतम जाधव, राहुल जाधव, शंकर पोटिंदे, सागर कोथमिरे, राजू जाधव, डॉ. अमोल वाजे, प्रवीण पाटील, नारायण जाधव, दत्ता पाटील, महेंद्र शिंदे, अमित कोथमिरे, प्रवीण अहिरे, आशा भंदुरे, अर्चना कोथमिरे, रूपाली अहिरे, रोहिणी नायडू.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com