Corruption News : घरपट्टी, पाणीपट्टीत ग्रामसेवकाकडून भ्रष्टाचार; खडकसुकेणेकर एकवटले | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Anganwadi materials and utensils lying in dust in Gram Panchayat.

Corruption News : घरपट्टी, पाणीपट्टीत ग्रामसेवकाकडून भ्रष्टाचार; खडकसुकेणेकर एकवटले

मोहाडी (जि. नाशिक) : दिंडोरी तालुक्यातील खडकसुकेणे येथील ग्रामसेवक यांनी नागरिकांच्या घरपट्टी, पाणीपट्टी वसुलीत अपहार केला असल्याचा आरोप ग्रामस्थ यांनी केला आहे. तसेच अंगणवाडीला देखील सहा वर्षापासून साहित्य पुरवठा केला नसल्याचे देखील ग्रामस्थ यांनी सांगत तत्काळ ग्रामसेवक याची बदली करण्याचा ठराव ग्रामसभेत केला. (Corruption by Gram Sevak in property tax waterbill at Khadaksukene nashik news)

ग्रामसेवक म्हणजे गावच्या विकासाचा पाया असतो, मात्र खडकसुकेणे (ता. दिंडोरी) गावातील ग्रामसेवकाचा आडमुठेपणा व भ्रष्टाचारामुळे गावच्या विकासाला खीळ बसली आहे. यामुळे ग्रामस्थांनी एकत्र येत ग्रामसभेत ग्रामसेवक याची तत्काळ बदली करण्याचा ठराव केला. खडकसुकेने येथे ग्रामसेवक पवन शिरकांडे सात वर्षापासून कार्यरत आहे. या काळात शिरकांडे हे काम करत नसल्याचा आरोप ग्रामस्थ करत आहे.

२०१९ मध्ये अंगणवाडीसाठी ७० हजार रुपयांचे भांडी खरेदी करण्यासाठी पैसे काढले असून अद्याप एकही साहित्य अंगणवाडीस पुरविलेले नसल्याने याबाबत ग्रामसभेत ग्रामस्थ यांनी जाब विचारला असता कुठलीच माहिती सरपंच व ग्रामस्थांना ग्रामसेवकांनी दिली नाही. त्यानंतर केवळ आठ हजारांची भांडे खरेदी करत ते ग्रामस्थांना दाखविले. त्याला सरपंच व ग्रामस्थांनी विरोध केल्यामुळे ती भांडी ग्रामपंचायत कार्यालयात चार महिन्यापासून धुळखात पडली आहेत. तसेच घरपट्टी, पाणीपट्टी जमा केल्यानंतर त्यासंदर्भात पावती ग्रामस्थांना देण्यात आले नसल्याचा आरोपही ग्रामस्थांनी केला आहे.

हेही वाचा : संयुक्त नावावरील गृहकर्जातून होईल प्राप्तीकराची बचत...

हेही वाचा: Police Tranfers : अमरावतीच्या विशेष पोलीस महानिरीक्षकपदी नाईकनवरे

पंधराव्या वित्त आयोगातून पाणीपुरवठा करण्यासाठी दीड लाख रुपये खर्चून पाण्याची टाकी बांधण्यात आली असून टाकीला अद्याप तोट्या व पाइप न बसविल्यामुळे टाकीतून कुठलाही पाणीपुरवठा गावाला होत नाही. ग्रामसेवक यांची बदली करण्यासाठी वारंवार प्रशासनाला पाठपुरावा केल्यानंतर त्यांची अद्याप बदली न झाल्याने ग्रामस्थ आश्‍चर्य व्यक्त करत आहे.

"ग्रामसेवक पवन शिरकांडे ग्रामपंचायतीत सात वर्षापासून कार्यरत आहे. मी सरपंच झाल्यापासून त्यांनी अद्यापही एकही व्यवहार आम्हाला सांगितलेला नाही. शिरकांडे यांनी यापूर्वी केलेले अनेक आर्थिक व्यवहार संशयास्पद असून त्याबाबत ते मासिक मीटिंगमध्ये देखील सदस्यांना माहिती देत नाहीत. त्यांच्या मनमानीमुळे कारभारामुळे गावचा विकास खुंटला आहे."

- विजय गांगुर्डे, सरपंच, खडकसुकेणे.

हेही वाचा: Nashik News : चांदवडला इलेक्ट्रिक दुकानास आग; जवळपास 25 लाखाच्या वस्तू जळून खाक!