Police Tranfers : अमरावतीच्या विशेष पोलीस महानिरीक्षकपदी नाईकनवरे

IG jayant naiknavare Latest News
IG jayant naiknavare Latest Newsesakal

नाशिक : नाशिक शहराचे पोलीस आयुक्त जयंत नाईकनवरे यांची तडकाफडकी बदली करण्यात आली. मात्र ते पदस्थापनेच्या प्रतिक्षेत होते. बदलीच्या आदेशाच्या १२ तासात त्यांची अमरावती परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. गेल्या एप्रिल महिन्यात नाईकनवरे नाशिक शहर पोलीस आयुक्तपदी रुजू झाले होते. (Police Transfers jayant Naiknaware as Special Inspector General of Police Amravati Nashik News)

हेही वाचा : संयुक्त नावावरील गृहकर्जातून होईल प्राप्तीकराची बचत...

IG jayant naiknavare Latest News
Dhule News : रेल्वे मोजणी स्थिती; 9 गावांमधील मोजणी पूर्ण

मंगळवारी (ता. १३) रात्री महाराष्ट्र पोलीस दलातील ३६ अपर संचालकांसह विशेष पोलीस महानिरीक्षक, उपमहानिरीक्षक व आयुक्तांच्या बदल्या बदल्या करण्यात आल्या आहेत. यामध्ये नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक बी.जी. शेखर, नाशिकचे पोलीस आयुक्त जयंत नाईकनवरे, पुण्याचे आयुक्त अमिताभ गुप्ता, पिंपरी चिंचवडचे आयुक्त अंकुश शिंदे यांचा समावेश आहे.

नाशिकचे आयुक्त नाईकनवरे यांची अवघ्या आठ महिन्यांमध्येच तडकाफडकी बदली करण्यात आली. तर पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त अंकुश शिंदे हे नाशिकचे नवीन पोलीस आयुक्त असतील. नाईकनवरे हे पदस्थापनेच्या प्रतिक्षेत होते. मात्र अवघ्या बारा तासांमध्ये त्यांची नियुक्ती अमरावती परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षकपदी करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे, नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक बी.जी. शेखर यांचीही बदली झाली असून ते पदस्थापनेच्या प्रतिक्षेत आहेत.

IG jayant naiknavare Latest News
Postal Department Recruitment : डाक विभागात जीवन विमा अभिकर्त्यांची थेट भरती; या आहेत अटी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com