esakal | एक महिन्याच्या प्रतीक्षेनंतर नामपूर ग्रामीणला कोविड सेंटर सुरू
sakal

बोलून बातमी शोधा

rural hospita nampur

एक महिन्याच्या प्रतीक्षेनंतर नामपूर ग्रामीणला कोविड सेंटर सुरू

sakal_logo
By
प्रशांत बैरागी

नामपूर (जि. नाशिक) : मोसम खोऱ्याचे मध्यवर्ती ठिकाण असलेल्या येथील ग्रामीण रुग्णालयात तब्बल एका महिन्याच्या प्रतीक्षेनंतर कोविड केअर रुग्णालय(covid hospital) गुरुवारी (ता. ६) सुरू झाले. पहिल्याच दिवशी तीन कोरोना पॉझिटिव्ह(corona positive) रुग्ण दाखल झाल्याचे वैद्यकीय अधिकारी डॉ. यू. पी. हेंद्रे यांनी सांगितले. कोरोनाच्या(corona virus) वाढत्या प्रभावामुळे नामपूरचे ग्रामीण रुग्णालय(rural hospital) कोरोनाबाधित रुग्णांना वरदान ठरणार आहे. (After a month of waiting Covid Center started in Nampur)

ऑक्सिजन अभावी विलंब

बागलाण तालुक्यात वैद्यकीय सुविधांअभावी कोरोनाबाधित रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी एक महिन्यापूर्वी येथील ग्रामीण रुग्णालयात कोविड केअर सेंटर सुरू करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार सुरवातीला पाइप फिटिंगचे(pipe fitting) काम पूर्ण झाले; परंतु ऑक्सिजनचा(oxygen) पुरवठा न झाल्यामुळे कोविड सेंटर सुरू होण्यास विलंब झाला. याबाबत स्थानिक लोकप्रतिनिधींना सातत्याने जिल्हाधिकारी, जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांकडे पाठपुरावा केल्याने सुरवातीला दहा ऑक्सिजन बेडसाठी सुविधा कार्यान्वित करण्यात आली.

हेही वाचा: कोरोनावर मात केल्यानंतर टुथब्रश का बदलावा?

घोषणा ३० बेडची, प्रत्यक्षात मात्र २० बेड

जिल्हा प्रशासनाने नामपूरसाठी ३० ऑक्सिजन बेडची(oxygen bed) घोषणा केली होती. प्रत्यक्षात २० बेडसाठीच ऑक्सिजन नळकांड्या फिटिंग व टेस्टिंगचे काम झाले आहे. येथील ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी, तंत्रज्ञ, आरोग्य कर्मचाऱ्यांची रिक्त पदे, अत्यल्प औषधसाठा, अपुरी वैद्यकीय सामग्री, अत्याधुनिक बेडचा अभाव, पाण्याची टंचाई अशा सुविधांची वानवा आहे. तसेच कोविड सेंटर सुरू झाल्याने ऑक्सिजनचा नियमित पुरवठा होणे गरजेचे आहे. नामपूर तालुक्यातील सर्वांत मोठे शहर असून, परिसरातील ३५ ते ४० गावांचा संपर्क लक्षात घेता कोरोनाच्या रुग्णांसाठी तातडीने ३० ऑक्सिजन बेडची सुविधा कार्यान्वित करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

हेही वाचा: नाशिककरांचे वाचले तब्बल साडेबारा कोटी रुपये!

कर्मचाऱ्यांची पदे रिक्त

कोविड सेंटरसाठी एमडी(MD) वैद्यकीय अधिकारी, परिचारिका, ईसीजी(ECG) मशिन व एक्स-रे(X-Ray) मशिन तंत्रज्ञ, कक्षसेवक, स्वच्छता कर्मचारी यांची तातडीची गरज आहे. रुग्णालयात वैद्यकीय अधिकाऱ्यांसह परिचारिका, एक्स-रे तंत्रज्ञ, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, लिपिक, मिश्रक, वाहनचालक, सफाई कामगार अशी २५ पदे मंजूर आहेत. परंतु प्रत्यक्षात वैद्यकीय अधिकारी, फार्मासिस्ट, परिचारिका, प्रयोगशाळा तंत्रज्ञ वॉर्डबॉय आदी पदे रिक्त असल्याने आरोग्यसेवकांना एकापेक्षा अधिक कामे करावी लागत असल्याचे वास्तव चित्र आहे.