esakal | नाशिककरांचे वाचले तब्बल साडेबारा कोटी रुपये!
sakal

बोलून बातमी शोधा

corona test

नाशिककरांचे वाचले तब्बल साडेबारा कोटी रुपये!

sakal_logo
By
विनोद बेदरकर

नाशिक : गेल्या दीड वर्षांपासून सर्वत्र कोरोना संसर्ग(corona virus) आजाराने थैमान घातले आहे. वाढत्या रुग्णसंख्येबरोबर रुग्णांवर उपचारासाठी लागणाऱ्या साधन सामुग्रीचा देखील तुटवडा निर्माण झाला आहे. अशातच नाशिककरांचे जवळपास साडेबारा कोटी रुपये वाचले. (free corona test Nashik citizens)

चाचणीसाठी साधारण खर्च बाराशे रुपये

लक्षणे आढळणाऱ्या नागरिकांना कोरोना तपासणीसाठी(corona testing) खाजगी रुग्णालयात सुमारे बाराशे रुपये खर्च येतो. जिल्हा रुग्णालयात उभारलेल्या कोरोना टेस्टिंग लॅबमध्ये(testing lab) गेल्या नऊ महिन्यात जवळपास सव्वा लाख नागरिकांची मोफत कोरोना टेस्टिंग(free testing) करण्यात आली. गेल्यावर्षी ७ ऑगस्टला खासदार हेमंत गोडसे यांनी स्वत:च्या संपूर्ण एक कोटी रुपयांच्या निधीतून नाशिक जिल्हा रुग्णालयात खासदारांच्या स्थानिक विकास निधीतून जिल्हा रुग्णालयात तब्बल एक कोटी रुपयांच्या निधीतून कोरोना टेस्टिंग लॅबचे लोकार्पण करण्यात आले होते. पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते या लॅबचे उद्‌घाटन झाले. कोरोनाची चाचणी करण्यासाठी साधारण बाराशे रुपये खर्च येतो. मात्र जिल्हा रुग्णालयातील सरकारी लॅबमध्ये संपूर्ण चाचणी मोफत करण्यात येते. त्यामुळे आतापर्यन्त तब्बल साडेबारा कोटी रुपयांचा आर्थीक खर्च वाचला आहे. गेल्यावर्षी कोरोनाचा वाढता प्रादूर्भाव लक्षात घेता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रत्येक जिल्ह्यात कोरोना टेस्टिंग लॅब असावी, असे निर्देश दिले होते. त्यानंतर खासदार गोडसे यांनी स्थानिक विकास निधीतून ही लॅब उभारली.

हेही वाचा: कोरोना महामारीत सीटी स्कॅनचे मार्केट पाचपटीने ‘अप'

रिपोर्ट होतात जलदगतीने प्राप्त

स्वॅब तपासणीसाठी धुळे, पुणे येथे पाठवावे लागत होते. मात्र लॅब कार्यान्वित झाल्यापासून स्वॅब तपासणी इथेच होत असल्यामुळे रिपोर्ट येण्यात गती प्राप्त झाली आहे. गेल्या दोन महिन्यांपासून नाशिक शहरासह संपूर्ण जिल्ह्यात पुन्हा कोरोना संसर्ग आजाराने थैमान घातल्याने रुग्णसंख्येचा विस्फोट झाला आहे. त्यामुळे या लॅबमध्ये दररोज जवळपास पाचशे तर सातशे रुग्णांचे स्वॅब(swab) तपासणीसाठी घेतले जात अूसन रविवार २ मे पर्यत १ लाख २५ हजार ८५९ स्वॅब तपासरणीसाठी घेतले असून त्यातील ३४९८९ रिपोर्ट पॉझिटिव्ह(positive) आले असल्याची माहिती जिल्हा रुग्णालयाचे लॅबचे मायक्रो बायोलाजिस्ट(micro biologist) पी. गांगुर्डे यांनी दिली. या मोफत तपासणीमुळे आजवर जवळपास साडेबारा कोटी रुपये वाचले आहेत.

हेही वाचा: मास्क नसल्यास अटकेचा आदेश काढणारे अध्यक्षच मास्कविना

लॅबमधील स्वॅब तपासण्या

तपासणीला घेतलेले एकूण स्वॅब : १२५८५९

तपासणीपैकी पॉझिटिव्ह आलेले स्वॅब : ३४९८९

loading image
go to top