Scam
sakal
नाशिक: कोविड लाटेदरम्यान नाशिक जिल्हा शासकीय रुग्णालयात ३० आणि मालेगाव सामान्य रुग्णालयात १० खाटांचे अतिदक्षता विभाग तयार करण्याचे कंत्राट घेतलेल्या सीपीपीएल (मे. क्रेनोव्हेटिव्ह पॉवरटेक प्रा.लि.) या कंपनीने ३ कोटी ३७ लाखांची शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी संशयित डॉ. निखिल सैंदाणे आणि डॉ. राहुल हाडपे यांचे अटकपूर्व जामीन अर्ज जिल्हा न्यायालयाने फेटाळून लावले आहेत. यामुळे दोघांसह अन्य संशयितांच्या अडचणी वाढल्या असून, पोलिसांकडून अटकेची शक्यता आहे.