Nikhil Saindane
sakal
नाशिक: कोविड काळात नाशिक जिल्हा रुग्णालय व मालेगाव सामान्य रुग्णालयातील आयसीयू (अतिदक्षता विभाग) उभारणीदरम्यान कोट्यवधी रुपयांचा अपहार झाल्याच्या प्रकरणात अटकेत असलेले तत्कालीन मुख्य प्रशासकीय अधिकारी तथा मालेगाव सामान्य रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. निखिल सैंदाणे याच्या जामीन अर्जावरील सुनावणी पुन्हा पुढे ढकलण्यात आली आहे. आता गुरुवारी (ता. २२) या अर्जावर सुनावणी होईल.