ICU Scam
sakal
नाशिक: कोविड काळात नाशिक जिल्हा रुग्णालय व मालेगाव सामान्य रुग्णालयातील आयसीयू (अतिदक्षता विभाग) उभारणीच्या नावाखाली कोट्यवधी रुपयांचा अपहार केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेले तत्कालीन मुख्य प्रशासकीय अधिकारी व मालेगाव सामान्य रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. निखिल सैंदाणे याची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. त्यांना नाशिक रोड मध्यवर्ती कारागृह येथे ठेवण्यात आले आहे.