Nashik News: चांदवडला बेवारस अवस्थेत गायीचं वासरू थंडीने तडफडतय; नगरपरिषदेचे दुर्लक्ष

 cow calf is suffering from cold in chandwad nashik news
cow calf is suffering from cold in chandwad nashik news

Nashik News: चांदवड येथील बाजारतळात गेल्या चार पाच दिवसांपासून गायीचे वासरू थंडीने तडफडत असून त्याच्याकडे कुणाचेही लक्ष नाही. शहरात चांदवड- मनमाड रोडलगत असणाऱ्या बाजारतळात हे बेवारस वासरू तडफडत एकाच जागेवर आहे.

थंडीचे प्रमाण जास्त असल्याने त्यांच्या जीविताला धोका निर्माण झाला आहे. (cow calf is suffering from cold in chandwad nashik news)

शहरात फिरणाऱ्या बेवारस गायीचं हे वासरू असल्याचा अंदाज आहे. तरीही याकडे नगरपरिषदेच्या प्रशासनाने लक्ष देऊन या बेवारस वासरावर योग्य उपचार करून त्याला आसरा द्यायला हवा.

याबाबत सकाळच्या प्रतिनिधीने नगरपरिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रमाकांत डाके यांच्या ही बाब लक्षात आणून दिली. त्यानंतर त्यांनी आम्ही या वासराला जास्तीत जास्त पशुसंवर्धन दवाखान्यात पोहचवू शकतो असे सांगितले.

 cow calf is suffering from cold in chandwad nashik news
Animal Ambulance : मोकाट, भटक्या जनावरांसाठी मनपाकडून रुग्णवाहिकेची सुविधा

या निमित्ताने शहरातील बेवारस गायी व वासरांच्या समस्येचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. बेवारस गायींची व वासरांची जबाबदारी कुणाची त्यांना काही आजारपण आले काही झाले तर त्याकडे कुणी बघायचं हाही प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होतो आहे. नगरपरिषदेची जबाबदारीच नसेल तर मग हिंदू धर्मात पवित्र मानल गेलेल्या गायींना असंच तडफडत पडू द्यायचे का हा प्रश्न आहे.

"गेल्या चार पाच दिवसांपासून हे गायीचं वासरू बेवारस अवस्थेत थंडीनं तडफडत असून त्यावर नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांना सांगून ही त्याकडे नगरपरिषदेचे लक्ष नाही. तात्काळ उपाययोजना करत वासराला जीवदान मिळायला हवे." -रविंद्र बागुल, सामाजिक कार्यकर्ते, चांदवड

 cow calf is suffering from cold in chandwad nashik news
Teacher Bharti: उत्तर महाराष्ट्रातील शिक्षकांची साडेचार हजारांहून अधिक पदे; शिक्षण आयुक्तांकडून हिरवा कंदील

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com