Nashik News: गो-मातेने दिला तिळ्यांना जन्म! वासरांचे आरोग्य सुस्थितीत ; पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांकडून उपचार

cow & calve
cow & calveesakal

सोनज : गायीचे व्याली हा ग्रामीण भागात नित्याचा विषय. प्रत्येक गाय व्याल्यावर एखाद्या वासराला जन्म देते. काही तुरळक प्रसंगी जुळ्या वासरांना जन्म दिल्याचे अनेकांनी अनुभवले.

मात्र, ढवळेश्‍वर (ता. मालेगाव) येथील मित्रनगर भागातील रहिवासी त्र्यंबक निकम यांच्या मालकीच्या गाईने शनिवारी (ता. १६) रात्री तिळयांना जन्म दिला. (cow gave birth to 3 calves in good health Treatment by Veterinary Officers at sonaj Nashik News)

गाय जुळ्यांना जन्म देते, त्यावेळी एक कालवड आणि एक बैलवर्गीय वासरू असते. श्री. निकम यांच्या गायीने तीनही कालवडींना जन्म दिला आहे. तीनही वासरांचे आरोग्य सुस्थितीत आहे. पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांच्यावर उपचार केले आहेत.

पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार ज्यावेळी गाय जुळ्यांना जन्म देते, अशावेळी दोघांपैकी एक हे भविष्यात प्रजनन करू शकत नाही.

परंतु, या तीनही कालवडी त्याला अपवाद असल्याचे पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. श्री. निकम यांच्या गायीने तिळ्यांना जन्म दिल्याचा विषय पंचक्रोशीत चर्चेत झाला असून त्याबद्दल आश्‍चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

पशुवैद्यकीय अधिकारी जावेद खाटीक यांना मिळताच गायीने तिळ्यांना जन्म दिल्याची माहिती मिळताच, त्यांनी प्रत्यक्ष गाय आणि वासरांची तपासणी करून परिस्थितीची माहिती जाणून घेतली. जनुकीय बदलांमुळे ही न घडणारी गोष्ट घडली असल्याचे आणि गाय आणि वासरांना कुठलाही धोका नसल्याचे डॉ. खाटीक यांनी सांगितले.

पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी गाईला अँटिबायोटिक इंजेक्शन आणि औषधाचे द्रावण दिले. गोंडस वासरांना पाहण्यासाठी पंचक्रोशीतील नागरिकांनी गर्दी केली आहे.

‘सुपर ओव्हूलेशन' मध्ये बीजांड कोषामधून ‘ग्राफ' आणि ‘फॉलीकल' मध्ये शुक्राणू गेले असल्यास तिळे होण्याची शक्यता ९९ टक्के असते. तसा प्रकार यावेळी घडला असल्याचे मत पशुवैद्यक अभ्यासकांनी व्यक्त केले आहे.

cow & calve
SAKAL Exclusive: माध्यान्ह भोजन योजनेत अंडी वाटपासाठी अनुदान अपुरे! थंडीमुळे भाव झालेत ‘गरम'

२० वर्षानंतर तिळ्यांना जन्म

राज्यात २० वर्षानंतर गायीने तिळ्यांना जन्म देण्याचा प्रकार घडला आहे. यापूर्वी जानेवारी २००३ मध्ये मिरज (जि. सांगली) येथे गायीने तिळांना जन्म दिला होता. त्यानंतर राज्यात कुठेही असा प्रकार घडला नसल्याचे पशू अभ्यासकांनी सांगितले.

"गेली अनेक दशके आपल्याकडे विविध जनावरे आहेत. गाय, म्हैस यांची प्रजनन नेहमी बघत आलो आहे. परंतु गाईने तिळ्यांना जन्म देणे, हा आश्‍चर्यकारक प्रकार आहे. गेली अनेक दिवस आम्ही गायीची योग्य रीतीने काळजी घेतली. यापुढे गाय आणि वासरांचे चांगल्या पद्धतीने पालन पोषण करू. गो-मातेला तिळे झाल्याने आम्ही आनंदीत झालो आहोत."

- त्र्यंबक निकम, गायीचे मालक

"गायीने तिळ्यांना जन्म दिल्याचे समजल्यानंतर लगेच ढवळेश्‍वरला भेट दिली. दुर्मीळ असा हा प्रकार आहे. तीन वासरांना जन्म दिल्यानंतर गाय व वासरे सुस्थितीत आहेत. गाय आणि वासरांवर योग्य तो उपचार करण्यात आला आहे."

- डॉ. जावेद खाटीक, तालुका पशुवैद्यकीय अधिकारी, मालेगाव

cow & calve
Nashik News: नांदगावकर वाढत्या वाहतुकीमुळे प्रदूषणाच्या विळख्यात! महामार्ग प्राधिकरणासह पोलिसांना निघेना तोडगा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com