Raju Desale and Viraj Devang
sakal
नाशिक: भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या राष्ट्रीय अधिवेशनात नाशिकचे राजू देसले व विराज देवांग यांची राष्ट्रीय कौन्सिलवर एकमताने निवड करण्यात आली. पक्षाचे राष्ट्रीय अधिवेशन २१ ते २५ सप्टेंबरदरम्यान चंडीगड येथे झाले. शेवटच्या दिवशी झालेल्या राष्ट्रीय कौन्सिलच्या निवडणुकीत महाराष्ट्रातून चार जणांची एकमताने निवड झाली. यात राज्य सचिव सुभाष लांडे (पश्चिम महाराष्ट्र), राज्य सहसचिव राजू देसले (नाशिक, उत्तर महाराष्ट्र), राज्य सहसचिव श्याम काळे (विदर्भ), मुंबई जिल्हा सचिव मिलिंद रानडे (मुंबई) यांचा समावेश आहे.