इंदिरानगर- साईनाथनगर चौफुली ते वडाळा गाव दरम्यान रस्ता अनधिकृत पार्किंगवर वाहतूक शाखेचे वरिष्ठ निरीक्षक दिवाणसिंग वसावे यांच्या नेतृत्वाखाली शुक्रवारी (ता. २१) धडक कारवाई करण्यात आली. कारवाईचे नागरिकांनी स्वागत केले असून, कित्येक महिन्यांनंतर या रस्त्याने मोकळा श्वास घेतला. या भागातील खासगी आस्थापनांत कामानिमित्त येणाऱ्या अभ्यागतांच्या वाहनांच्या पार्किंगने हा ३० मीटर रस्ता गिळंकृत केला होता. येथे वाहने सर्रास लावली जात होती. परिणामी, रस्ता अरुंद झाल्याने अपघातांचे प्रमाण वाढले होते.