Wedding Season : डिजिटल लग्नपत्रिकाची वाढली क्रेझ; नातेसंबंध मात्र दुरावले

आधुनिक ऑनलाइन युगात सर्वच गोष्टी बदलल्या आहेत. त्यात निमंत्रण देण्याच्या पद्धतीचाही समावेश आहे.
Digital magazine of invitation
Digital magazine of invitationesakal

Wedding Season : आधुनिक ऑनलाइन युगात सर्वच गोष्टी बदलल्या आहेत. त्यात निमंत्रण देण्याच्या पद्धतीचाही समावेश आहे. सध्या डिजिटल लग्नपत्रिकाचा क्रेझ दिवसेंदिवस वाढत आहे. व्हिडिओ स्वरूपातील लग्नपत्रिका तयार करून सोशल मीडियाच्या माध्यमातून आप्तस्वकीयांना पाठविली जात आहे.

त्यामुळे निमंत्रण प्रक्रियेतील खर्च जरी कमी झाला असला तरी नातेसंबंध मात्र दुरावले आहेत. (craze of digital wedding cards has increased nashik news)

ऑनलाइन, धावपळीचे युग आणि महागाईची चपराक यामुळे सर्वच पद्धतींमध्ये बदल झाला आहे. निमंत्रण देण्याच्या पत्रिकांचाही ट्रेड बदलला आहे. सध्या व्हॉट्सॲप, फेसबुक ऑनलाइन माध्यमातून निमंत्रण देण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यासाठी डिजिटल निमंत्रण पत्रिकांची क्रेझ आली आहे.

व्हिडिओ आणि फोटो अशा दोन स्वरूपात डिजिटल पत्रिका विकसित होत आहे. आकर्षक वाटेल तशा डिझाइनमध्ये वर-वधूचे छायाचित्र, तसेच अन्य विविध प्रकारच्या निमंत्रणाचे छायाचित्रांचा समावेश करून पत्रिका तयार केली जात आहे. सोहळ्यास काही दिवस शिल्लक असताना या पत्रिका व्हॉट्सॲप आणि फेसबुकच्या माध्यमातून सेंड केल्या जात आहेत.

Digital magazine of invitation
Wedding Season :  लग्नात आहेराच्या साड्यांवर नका करू जास्त खर्च, इथं मिळतात १०० ला चार साड्या!  

अशा डिजिटल पत्रिकांमुळे वेळ आणि पैशांची बचत होत आहे. असे जरी असले तरी नातेसंबंध मात्र दुरावत आहेत. निमंत्रण देण्याच्या निमित्ताने पूर्वी प्रत्येक जण आप्तस्वकीयांची, मित्रपरिवार यांची भेट घेत असत. भेट झाल्यानंतर त्यांची खुशाली जाणून घेतली जात. डिजिटल पत्रिका आल्यापासून अशा प्रकारची भेट होणे दुर्मिळ झाले आहे.

त्याचप्रमाणे काही आप्तसंबंधी किंवा मित्रपरिवार व्हॉट्सॲपवर पत्रिका आली आहे. तर त्यावरच शुभेच्छा देऊन टाकू या, अशी भूमिका घेत असल्याने सोहळ्यांचे आकर्षणही संपुष्टात आले आहे. नाहीच्या प्रमाणात पाहुणेमंडळी सोहळ्यांना उपस्थिती दर्शवत असल्याचे चित्र अनेक वेळा बघावयास मिळत आहे. काहीजण मात्र आजही पारंपरिक पद्धतीचा अवलंब करत आहे.

व्यवसायांवर झाला परिणाम

लग्न सोहळ्यांसह अन्य विविध प्रकारच्या सोहळ्यांसाठी पूर्वी निमंत्रणपत्रिका दिली जात होती. त्यामुळे विविध प्रकारच्या कोऱ्या पत्रिका बाजारात खरेदी-विक्री होत असत. त्या कोऱ्या पत्रिका खरेदी करून नंतर त्यांची छपाई होत. यामुळे पत्रिकाविक्रेता आणि छपाई करणारे यांचे व्यवसाय तेजीत असायचे. डिजिटल पत्रिकांमुळे या दोन्ही व्यवसायांवर मोठा परिणाम झाला आहे. उपजीविका चालविणे अवघड झाले आहे.

Digital magazine of invitation
Wedding Season: तुलसी विवाहानंतर आता लग्नसोहळ्यांचा धूमधडाका; वधू-वर संशोधन मोहिमेस वेग

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com