Latest Marathi News | एकाच छताखाली गृहशोधाची नाशिककरांना संधी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Credai Nashik Metro Shelter exhibition from 24th November

Credai Nashik Metro Shelter Exhibition : एकाच छताखाली गृहशोधाची नाशिककरांना संधी

नाशिक : दरवर्षी नाशिककरांसह संपूर्ण महाराष्ट्रातील नागरिक वाट पाहत असलेल्या शेल्टर प्रदर्शनाचा शंखनाद झाला असून, येत्या २४ ते २८ नोव्हेंबर असे पाच दिवस नाशिककरांना पर्वणी अनुभवता येणार आहे. या वर्षाच्या शेल्टर प्रदर्शनात शंभर बांधकाम व्यावसायिकांचे पाचशेहून अधिक प्रकल्प पाहण्याची संधी आहे. त्याचबरोबर बांधकाम साहित्य, इंटेरियर, गृहकर्ज संस्थांचा सहभाग सहभाग राहणार आहे. प्रदर्शनाला लाखांहून अधिक नागरिक भेट देतील, असा विश्वास क्रेडाई नाशिक मेट्रो अध्यक्ष रवी महाजन यांनी व्यक्त केला.

सद्यःस्थितीत हवामान, उद्योग, शिक्षणाच्या सुविधांसह समृद्धी, सुरत- चेन्नई ग्रीन फिल्ड महामार्ग, मेट्रो निओ, नाशिक- पुणे सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्प येवू घातले आहे. त्याचप्रमाणे साडेतीन हजार कोटी रुपयांचा रिलायन्स लाइफ सायन्स प्रकल्प, इंडियन ऑइल प्रकल्प, कार्पोरेट हॉस्पिटल्स, शैक्षणिक संस्थांमुळे नाशिकच्या विकासाला चालना मिळत आहे. नवीन प्रकल्पांमुळे व्यवसायाच्या व रोजगार निर्मितीच्या अनेक संधी शहरात उपलब्ध होणार आहे.

(Credai Nashik Metro Shelter Exhibition starting from 24 to 28 November opportunity for Nashik to search for housing under one roof Nashik News)

हेही वाचा: Nashik Crime Update : ढकांबेत पिस्तुलीचा धाक दाखवून धाडसी दरोडा

त्यामुळे घरांनादेखील मागणी वाढणार असल्याने त्या अनुषंगाने नाशिकचे बांधकाम क्षेत्र सज्ज असल्याचे क्रेडाईचे अध्यक्ष महाजन यांनी सांगितले. शेल्टर समन्वयक कृणाल पाटील म्हणाले, महाराष्ट्रातील सर्वात मोठे प्रदर्शन म्हणून नोंद होईल. दीड लाख चौरस फूट पॅव्हेलियन, स्वतंत्र बिझनेस लाउंज, ग्राहकांशी संवाद साधण्यासाठी समर्पित नेटवर्किंग पॉड्स, विशेष ऑफर, लकी ड्रॉ, आकर्षक स्पॉट बक्षीसे, हैप्पी स्ट्रीट ही वैशिष्टे प्रदर्शनाची आहे. हॅप्पी स्ट्रीट प्रदर्शनासाठी २२ नोव्हेंबर ऑनलाइन नोंदणी केल्यास प्रदर्शनासाठी प्रवेश शुल्क माफ राहणार आहे. प्रदर्शनाला भेट देण्यासाठी महत्त्वाच्या ठिकाणांहून वाहतूक व्यवस्था करण्यात आली आहे.

निवासी सोबतच व्यावसायिक प्रकल्प

नाशिकसह सिन्नर, दिंडोरी, धुळे, जळगाव, मालेगाव, त्र्यंबकेश्वर, इगतपुरी येथील निवासी, व्यावसायिक प्रकल्प एका छताखाली पाहण्याची संधी ग्राहकांना आहे. बजेट प्रॉपर्टीसह लक्झरी प्रकल्पांचा समावेश आहे. प्लॉट, फार्महाऊस, व्यावसायिक, शॉप्सचे पर्याय उपलब्ध राहणार आहेत. इलेक्ट्रिकल, टाइलिंग, प्लंबिंग, कंत्राटदार, खिडक्या, काच, सोलर, बांधकाम साहित्य, लिफ्ट, सिक्युरीटी सिस्टम याचीदेखील प्रदर्शनात माहिती मिळेल.

हेही वाचा: Nashik : नमामी गोदा प्रकल्प रेंगाळलाय कागदावरचं

शेल्टरमध्ये महत्त्वाचे

- जागतिक दर्जाच्या सुविधा.

- नाशिकमधील सर्वप्रथम लेगसी वॉल.

- २१ नोव्हेंबरपर्यंत ऑनलाइन नोंदणी केल्यास प्रवेश मोफत.

- दहा लकी ड्रॉ विजेता, एक बंपर बक्षिस.

- लहान मुलांसाठी प्ले एरिया, फन झोन.

- हॅप्पी स्ट्रीटमध्ये स्थानिक कलाकारांसह संगीत व फन फेअर.

"शेल्टर मध्ये शंभर बांधकाम व्यावसायिकांचे पाचशेहून अधिक प्रकल्प पाहण्याची संधी आहे. प्रदर्शनाला लाखांहून अधिक नागरिक भेट देतील."

- रवी महाजन, अध्यक्ष, क्रेडाई नाशिक मेट्रो

"कोरोनानंतर घरांची मागणी वाढल्याने अर्थव्यवस्था पूर्वपदावर येत आहे. त्यामुळे बाजारात उत्साहाचे वातावरण आहे. एकाच छताखाली अनेक पर्याय असल्याने प्रदर्शन यशस्वी होईल."

- कृणाल पाटील, प्रदर्शन समन्वयक

हेही वाचा: Nashik Transfers : सिडको प्रशासकांसह 8 कर्मचाऱ्यांची बदली