Nashik Cricket Match : दणदणीत विजय! नाशिकच्या पोरांनी मैदान मारले; आर्यन पालकर अन् चिन्मय भास्करची फटकेबाजी

Nashik Registers Dominant Win in MCA Tournament : एमसीए स्पर्धेत नाशिक संघाने पुनीत बालन क्रिकेट अकादमीवर ७ गडी राखून विजय मिळवताना व्यंकटेश बेहरेने ८ बळी घेत चमकदार कामगिरी केली.
Cricket Match

Cricket Match

sakal

Updated on

नाशिक: महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनतर्फे पुणे येथे वरिष्ठ राज्यस्तरीय आमंत्रितांची क्रिकेट स्‍पर्धा सुरु आहे. या स्पर्धेत नाशिकने पुनीत बालन क्रिकेट अकादमीविरुद्ध ७ गडी राखून दणदणीत विजय मिळवला. यात जलदगती व्यंकटेश बेहरेने सामन्यात ८ बळी घेतले. फलंदाजीत रवींद्र मत्च्याने पहिल्या डावात ७१ धावा करून मोलाचा वाटा उचलला. सलामीवीर चिन्मय भास्कर, आर्यन पालकरनेही फलंदाजीत चांगली कामगिरी केली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com