नाशिक: मानूर गाव परिसरामध्ये गावठी कट्टा बाळगून वावरत असलेल्या सराईत गुन्हेगाराला जेरबंद करण्यात आले आहे. त्याच्याकडून एक गावठी कट्टा आणि एक जिवंत काडतुसे जप्त करण्यात आले आहे. सदरची कारवाई शहर गुन्हे शाखेच्या युनिट एकच्या पथकाने केली आहे. योगेश बाळकृष्ण चव्हाण (वय २७, रा. रेशिमबंध लॉन्स, शंभुराजे कॉलनी, बंगला नं. १, हिरावाडी, नाशिक) असे अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे.