Nashik News : गुन्‍हा दाखल उमेदवार गुणवत्ता यादीत; आरोग्‍य विद्यापीठ भरतीत आणखी संशयित आले समोर

Maharashtra University of Health Science nashik
Maharashtra University of Health Science nashikesakal

नाशिक : महाराष्ट्र आरोग्‍य विज्ञान विद्यापीठाच्‍या भरती प्रक्रियेत गुणवत्ता यादीत समावेश असलेली आणखी काही संशयित नावे समोर आली आहेत. ‘म्‍हाडा’ भरतीतील गुन्‍हा दाखल असलेल्‍या उमेदवाराचे नाव ‘आरोग्य’च्‍या भरती प्रक्रियेत अव्वलस्‍थानी असल्‍याचे निदर्शनात आले आहे. विद्यापीठाने यापूर्वीच या प्रकरणी चौकशी समिती गठीत केली असून, त्‍यांच्‍यामार्फत या संपूर्ण प्रकाराचा तपास सुरू आहे. (crime filed candidate in merit list Some more suspects found in Health University recruitment Nashik News)

महाराष्ट्र आरोग्‍य विज्ञान विद्यापीठातर्फे विविध पदांकरिता भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. याअंतर्गत लेखी परीक्षेनंतर सध्या पदनिहाय कागदपत्र पडताळणीची प्रक्रिया सुरू आहे. तत्‍पूर्वी विद्यापीठातर्फे गुणवत्तायादी प्रसिद्ध करताना उमेदवार व त्‍यांना मिळालेल्‍या गुणांचा तपशील जारी केला होता.

यावर्षी फेब्रुवारीत त झालेल्‍या ‘म्‍हाडा’च्‍या भरती प्रक्रियेत गैरव्‍यवहार प्रकरणी गुन्‍हा दाखल असलेल्‍या दोन उमेदवारांची नावे कनिष्ठ लिपिक पदाच्‍या गुणवत्ता यादीत असल्‍याची माहिती समोर आली होती. तसेच अन्‍य काही संशयित नावांचा यादीत समावेश असल्‍याचे निदर्शनात आले होते. स्‍पर्धा परीक्षा समन्‍वय समितीने यासंदर्भात पुरावेदेखील सादर केले होते.

हेही वाचा : Love Jihad: प्रेमाला धर्म आहे...?

Maharashtra University of Health Science nashik
Nashik News: ज्यांच्याशी लढलो त्यांच्या मांडीला मांडी लावून बसण्याची वेळ; चौधरी अन् पाटलांचा शिंदे गटात प्रवेश

दरम्‍यान, हरकती, आक्षेपांची दखल घेत विद्यापीठातर्फे चौकशी समिती गठीत करण्यात आली आहे. या समितीची बैठक नुकतीच झाली. असे असताना वरिष्ठ लिपिक या पदासाठीच्‍या गुणवत्ता यादीतील अव्वलस्‍थानी नाव असलेल्‍या उमेदवाराचा समावेश ‘म्‍हाडा’प्रकरणी दाखल गुन्ह्यात असल्‍याने भरती प्रक्रिया पुन्‍हा एकदा संशयाच्‍या भोवऱ्यात आली आहे. तसेच ‘म्‍हाडा’ प्रकरणी दाखल गुन्ह्या‍तील संशयितांच्‍या भाऊ, बहिणींची नावे ‘आरोग्‍य’च्‍या गुणवत्ता यादीत समाविष्ट असल्‍याने संशय व्‍यक्‍त केला जात आहे.

विद्यापीठातर्फे चौकशी सुरू

विद्यापीठातर्फे गठीत चौकशी समितीतर्फे सखोल चौकशी सुरू असल्‍याची माहिती मिळत आहे. येत्‍या काही दिवसांत या संदर्भात अहवाल तयार करून सादर केला जाणार आहे. सादर पुराव्‍यांची सत्‍यता, कायदेशीर बाबी व अन्‍य तांत्रिक माहिती तपासून पाहिल्‍यानंतर समिती या संदर्भात ठोस निर्णय घेईल, अशी माहिती सूत्रांकडून देण्यात आली.

Maharashtra University of Health Science nashik
MGNREGA : ‘रोहयो’च्या सुधारित आकृतीबंधामधील विभागातील मंजूरपैकी बहुतांश पदे रिक्त!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com