Dada Bhuse
sakal
नाशिक: वाढत्या गुन्हेगारीमुळे शहराची कायदा व सुव्यवस्था धोक्यात आली असून, शहरातील गुन्हेगारीचा बिमोड करण्यासाठी सात दिवसांचा ‘अल्टिमेटम’शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी शहर पोलिसांना देत, गुन्हेगारी घटनांमध्ये कोणत्याही राजकीय पक्षाचा पदाधिकारी असला तरीही पोलिसांनी दबावाला बळी न पडता कारवाई करा, तसेच, रस्त्यावर पोलिस दिसला पाहिजे तरच, गुन्हेगार, विधीसंघर्षितांवर वचक बसेल. शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलिसांनी दक्ष राहावे, अशीही सूचना मंत्री भुसे यांनी पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांना केल्या आहेत.