Crime
sakal
नाशिक: जबरी चोरीच्या गुन्ह्यातील संशयिताला न्यायालयाच्या आदेशानुसार अटक वॉरंट बजावले आणि त्यास ताब्यात घेतले असता संशयिताच्या पत्नीने पोलिस ठाण्यात अक्षरश: धिंगाणा घातला. एवढेच नव्हे, तर संशयिताला न्यायालयात नेण्यापासून मज्जाव करताना न्यायालयाचे अटक वारंट चावून खाण्याचा प्रयत्न केला. तसेच, कडेवरील चिमुकल्याला टेबलावर आपटण्याचा प्रयत्नही केला. याप्रकरणी म्हसरूळ पोलिसांत संशयित दांपत्याविरोधात सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला. या प्रकरणामुळे मात्र पोलिसांची चांगलीच तारांबळ उडाली.