Nashik Police
sakal
नाशिक महानगराच्या कायदा आणि सुव्यवस्थेबाबत गेल्या काही दिवसांपासून सातत्याने चिंता व्यक्त होत आहे. खून, हाणामारीच्या सत्रानंतरही शांत असलेल्या यंत्रणेबाबत नाराजी वाढत असताना नाशिक रोडच्या गोरेवाडी भागात तरुणाच्या खुनानंतर काही तासांत पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांनी शहरातील पोलिस ठाण्यांच्या प्रमुखांच्या व्यापक प्रमाणात बदल्या केल्या.