Rising Crime in Nashik
sakal
नाशिक: साधारण दीड-दोन महिन्यांपासून न थांबलेले खूनसत्र, कोयतागँग आणि तरुणांच्या टोळक्यांकडून वरच्यावर पोलिसांना आव्हान देत शहराच्या विविध भागात घातलेल्या धुडगूसाने शहरातील कायदा आणि सुव्यवस्थेला आव्हान दिले आहे. शहरातील बिघडलेल्या शांततेबाबत मंत्री दादा भुसे व गिरीश महाजन आणि शहरातील तीन आमदारांनी जाहीर नाराजी व्यक्त केल्यानंतर आता पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांनी डॅमेज कंट्रोलसाठी पोलिस अधिकाऱ्यांच्या व्यापक बदल्या केल्याचे बोलले जाते.