Nashik Crime News : खबऱ्यांचा खोटारडेपणा उघड! सुपारी ट्रक अखेर पोलिस ठाण्यात
अन्न औषध प्रशासनाच्या नावाखाली बनावट अधिकार सांगणाऱ्या खबऱ्यांनी ताब्यात घेतलेले सुपारीने भरलेले ट्रक अखेर सातपूर पोलिस ठाण्यात जमा करण्यात आले असून, या प्रकरणाचा तपास गतीने सुरू आहे.
सातपूर- अन्न औषध प्रशासनाच्या खबरींनी आपणच अधिकारी आहोत, असे सांगून पकडलेले आणि येथील उद्योगभवन आवारात उभे करून दिलेले सुपारीचे दोन ट्रक शुक्रवारी (ता.२३) अखेर सातपूर पोलिस ठाण्यात आणण्यात आले आहेत.