Crime
sakal
जायखेडा पोलिस ठाण्याच्या हद्दीत चिमुकल्यांना चॉकलेटच्या बहाण्याने निर्जनस्थळी नेऊन अतिप्रसंग करण्याच्या एकापाठोपाठ तीन घटना घडल्या होत्या. नराधमाची कोणतीही माहिती मिळत नसताना जायखेडा पोलिस ठाण्याचे तत्कालीन प्रभारी अधिकारी उमेश पाटील यांनी हद्दीतील, तसेच गुजरात सीमेलगतच्या गाव-पाड्यांवर नराधमाचा शोध घेतला. दोन ते अडीच महिन्यांनी नराधमाच्या मुसक्या आवळण्यात प्रभारी अधिकारी पाटील यांना यश आले होते.