नाशिक- नाशिक तालुक्यातील सय्यद पिंप्री परिसरातील १२ वर्षांच्या मुलीवर बलात्कार करणाऱ्या नराधमाला जिल्हा न्यायालयाने २० वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा आणि १० हजारांच्या दंडाची शिक्षा ठोठावली आहे. सदर घटना २०२१ ते २०२२ या दरम्यान घडली होती. सूरज काळू गाडर (३०, रा. मांडणपाडा, ता. पेठ) असे आरोपीचे नाव आहे.