Nashik Crime News : सराईत गुन्हेगार दिवेला म्हसरुळमधून अटक

Crime News
Crime Newsesakal
Updated on

नाशिक : सराईत गुन्हेगार व सातपूर पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या मोकातील संशयित जयेश ऊर्फ जया हिरामण दिवे (रा. सिद्धी टॉवर, इंद्रकुंड, पंचवटी) यास गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने अटक केली आहे. (criminal Dive arrested from Mhasrul Nashik Crime News)

हेही वाचा : शेअर बाजारात सततचे लाॅसेस? मग यापैकी कुठली चूक होतेय? घ्या जाणून

Crime News
Jalgaon Crime News : एक कोटी 22 लाखाची वसुली पवारांच्या घरात!

सातपूर पोलिस ठाण्यात खंडणीप्रकरणी दाखल गुन्ह्यात दिवे याचा पोलिस शोध घेत होते. भाजप पदाधिकारी विक्रम नागरे यांना धमकावत त्यांच्याकडे खंडणी मागितल्याप्रकरणी सातपूर पोलिस ठाण्यात दोन गुन्हे दाखल आहेत.

पोलिसांनी या गुन्ह्यात मोकानुसार कारवाई करीत संशयितांची धरपकड सुरू केली आहे. त्यानुसार गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकातील अंमलदार विशाल देवरे यांना मिळालेल्या माहितीनुसार, संशयित जया दिवे हा म्हसरुळ आडगाव लिंक रोडवरील म्हाडा इमारतीसमोर येणार असल्याची माहिती समजली.

त्यानुसार पोलिस निरीक्षक विजय ढमाळ, प्रवीण वाघमारे, प्रदीप म्हसदे, आसिफ तांबोळी, नाझिम पठाण, प्रशांत मरकड, विशाल देवरे, महेश साळुंके यांच्या पथकाने सापळा रचून जया दिवे यास पकडले. त्याचा ताबा अंबड विभागाचे सहायक पोलिस आयुक्तांकडे देण्यात आला आहे. जया दिवे याच्याविरुद्ध १४ गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे.

Crime News
Pune Crime: पुण्यातील उच्चभ्रु परिसरात चोरांचा सुळसुळाट, पोलिसांनी केली 'ही' कारवाई!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com