Grapes Crisis : द्राक्ष बागायतदारांचे कंबरडे मोडले; प्रतिकिलो द्राक्षांच्या तुलनेत रद्दीचा दर दुप्पट! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Grapes

Grapes Crisis : द्राक्ष बागायतदारांचे कंबरडे मोडले; प्रतिकिलो द्राक्षांच्या तुलनेत रद्दीचा दर दुप्पट!

पिंपळगाव बसवंत (जि. नाशिक) : जिल्ह्याला परकीय चलन मिळवून देणाऱ्या द्राक्षास व्यापारी व दलालांकडून कवडीमोल भाव मिळत आहे. बाजारात किलोवर मिळणाऱ्या रद्दीपेक्षाही द्राक्षांना कमी दर मिळत आहे.

सध्या द्राक्षांच्या पॅकिंगसाठी बाजारात वापरात आणलेल्या रद्दीचा दर ४० रुपये किलो, तर द्राक्षांचा दर २० रुपये किलो आहे. त्यामुळे द्राक्षबागायतदारांचे कंबरडे मोडले आहे. (crisis of grape growers Double rate of packaging compared to grapes per kg nashik news)

जिल्ह्यात निफाड, दिंडोरी, नाशिक तालुक्यांत द्राक्षांचे चांगले उत्पादन घेतले जाते. सध्या जिल्ह्यात सर्वत्र बागा द्राक्षांनी लगडल्या आहेत. निर्यातीसाठी शेतकरी दलाल व व्यापाऱ्यांकडे चकरा मारत आहेत.

द्राक्ष हा नाशवंत असल्याने दलाल व व्यापारी जास्तीत जास्त माल कमीत कमी दरात खरेदी करताना दिसत आहेत. मात्र, हा माल खरेदी करताना त्याची किंमत बाजारात मिळणाऱ्या रद्दीपेक्षाही खालावल्याने शेतकऱ्याचे कंबरडे मोडले आहे.

हेही वाचा : नेट बँकिंग खात्यात ठेवा कमी रक्कम...जाणून घ्या कारण

सूर्यप्रकाशापासून द्राक्षांचा बचाव करण्यासाठी व त्यावरील हिरवा रंग टिकून राहण्यासाठी द्राक्षघडांना झाकण्यासाठी रद्दीचा वापर केला जातो. हा कागद मुंबईहून पिंपळगावच्या बाजारात दाखल होतो. त्यानंतर तो द्राक्ष निर्यात करणाऱ्या भागातील शेतकऱ्यांकडे येतो.

कमीत कमी दरात खरेदीकडे कल

या हंगामात युरोप मार्केटला जाणाऱ्या द्राक्षांना ६० ते ७० रुपये किलोचा भाव मिळाला आहे, तर स्थानिक मार्केटसाठी तयार केलेल्या द्राक्षांना २० ते ३० रुपये प्रतिकिलो भाव मिळाला आहे. लांब मण्याच्या, तसेच गोलाकार मण्यांच्या द्राक्षांनाही २० ते २५ रुपये असा भाव आहे.

टॅग्स :NashikGrapes