Nashik News : मनमाड नगर परिषदेला 10 कोटी रुपये मंजूर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Manmad City Council

Nashik News : मनमाड नगर परिषदेला 10 कोटी रुपये मंजूर

मनमाड (जि. नाशिक) : नगर परिषदेच्या जीर्ण झालेल्या इमारती संबंधी आमदार सुहास कांदे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे निधीची मागणी केली होती. या मागणीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिसाद देत दहा कोटी देण्याचा निर्णय जाहीर केला होता. याबाबतचा शासन निर्णय आज जारी झाला असून मनमाड नगर परिषदेच्या नवीन इमारतीसाठी दहा कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहे. (10 crore sanctioned to Manmad City Council Nashik News)

मनमाड शहरात असलेल्या पालिकेच्या शाळांच्या इमारती जीर्ण झालेल्या असून या शाळा बांधण्यासाठी आमदार सुहास कांदे यांनी प्रयत्न करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे निधी मिळावा यासाठी मनमाड येथे झालेल्या करंजवन योजनेच्या उद्घाटन प्रसंगी झालेल्या सभेत मागणी केली होती.

त्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सभेत दहा कोटी रुपये देणार असल्याचे जाहीर केले होते. त्यानुसार प्रशासनाने शासन निर्णय काढत मनमाड शहरातील नगर परिषदेच्या जीर्ण झालेल्या इमारती संबंधी दहा कोटी रुपये मंजुरीचे पत्र काढले आहे.

हेही वाचा : नेट बँकिंग खात्यात ठेवा कमी रक्कम...जाणून घ्या कारण

आमदार सुहास कांदे यांच्या संकल्पनेतून साकार होणाऱ्या पालिकेच्या शाळांच्या नव्या इमारती लवकरच उभ्या राहणार आहे. याबाबत आमदार सुहास कांदे म्हणाले की, मी माझ्या भाषणात नगरपालिकेची बिल्डिंग प्रचंड नादुरुस्त आहे.

नवीन इमारतसाठी दहा कोटी रुपये द्यावे अशी मुख्यमंत्र्यांकडे मागणी केली होती. मुख्यमंत्र्यांनी जाहीर केल्याप्रमाणे नगरपालिकेच्या नूतन इमारतीला दहा कोटी रुपये मंजूर झाले.

टॅग्स :Nashikmanmad