Crop Competition : देखण्या पिकांवर होणार बक्षिसांची खैरात! कृषी विभागाकडून पीक स्पर्धा

crop
crop crop insurance

Crop Competition : कृषी विभागामार्फत राबविल्या जाणाऱ्या अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या स्पर्धेच्या अंमलबजावणीच्या कार्यपद्धतीत यावर्षीपासून बदल करण्यात आले आहेत.

शेतकऱ्यांच्या देखण्या व भरघोस उत्पन्न घेणाऱ्या पिकांचा थेट राज्यस्तरावर गौरव होणार असल्याने या स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन कृषी विभागाने केले आहे. (crop competition was organised by Department of Agriculture nashik news)

खरिपातील पीक स्पर्धा एकाच वर्षात केवळ तालुकास्तरावर आयोजित करण्यासह तालुकास्तराची उत्पादकता राज्य, जिल्हा व तालुका पातळीवरील विजेते ठरविण्यासाठी निवडण्यात येणार आहे.

राज्यात पिकाची उत्पादकता वाढविण्यासाठी शेतकऱ्यांकडून विविध भागात विविध प्रयोग करण्यात येतात, अशा प्रयोगशील शेतकऱ्यांना मिळालेल्या उत्पादकतेबाबत प्रोत्साहन देऊन गौरव केल्यास त्यांची इच्छाशक्ती, मनोबल यामध्ये वाढ होणे, नवनवीन अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर करून कृषी उत्पादनांमध्ये वाढ होऊन इतर शेतकऱ्यांना त्यांचे मार्गदर्शन मिळावे या दृष्टिकोनातून पीक स्पर्धांचे आयोजन केले जाते.

सर्वसाधारण व आदिवासी या दोन गटात होणाऱ्या स्पर्धेसाठी जिल्ह्यांमध्ये खरीप हंगामामध्ये भात, ज्वारी, बाजरी, मका, नाचणी (रागी), तूर, मूग, उडीद, सोयाबीन, भुईमूग व सूर्यफूल या पिकांचा अंतर्भाव पीक स्पर्धा योजनेत केला आहे. स्पर्धेत सहभागासाठी भात, ज्वारी, बाजरी, मका, नाचणी (रागी), तूर, सोयाबीन, भुईमूग व सूर्यफूल या पिकांसाठी अंतिम मुदत ३१ ऑगस्ट आहे.

crop
Kharif Season: कृषी पंढरीमध्ये सर्वदूर खरीपासाठीच्या पेरणीलायक पावसाची प्रतीक्षा!

स्पर्धेत सहभागी होण्यासाठी शेतकऱ्यांना स्वत:च्या नावावर असलेला सातबारा, व ८अ आवश्यक असून आदिवासी शेतकरी बांधवांसाठी जातीचा दाखला असणे आवश्यक आहे. पीकनिहाय प्रवेश शुल्क ३०० रुपये तर आदिवासी गटासाठी १५० रुपये आहे.

स्पर्धेत सहभागासाठी शेतकऱ्यांच्या नावावर जमीन आवश्यक असून भात पिकासाठी २० आर तर इतर पिकासाठी ४० आर क्षेत्रावर सलग लागवड आवश्यक आहे. तालुका पातळीवर कृषी अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली पीक कापणी समिती स्थापन करण्यात आली असून कापणीचे निकष निश्चित करण्यात आले आहेत.

तालुका, जिल्हा व राज्य स्तरावर निकाल समित्या देखील स्थापन करण्यात आल्या आहेत. शेतकऱ्याचे पाच वर्षातील सरासरी उत्पादकता दीडपटीपेक्षा अधिक असेल असेच शेतकरी पुरस्कारासाठी पात्र ठरणार आहेत.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

crop
Agriculture Admission : कृषीचेही प्रवेश अभियांत्रिकीप्रमाणे; अंमलबजावणीबाबत मात्र अस्पष्टता

असे आहेत बक्षीसे

पीक स्पर्धेत निवड झालेल्या लाभार्थ्यांना बक्षिसाची रक्कम निश्चित करण्यात आली आहे. तालुका पातळीवर प्रथम क्रमांकास ५ हजार रुपये, द्वितीय क्रमांकास ३ हजार रुपये व तृतीय क्रमांकास २ हजाराचे बक्षीस मिळेल. जिल्हा पातळीवर निवड झालेल्या प्रथम क्रमांकास १० हजार, द्वितीय क्रमांकास ७ हजार व तृतीय क्रमांकास ५ हजाराचे बक्षीस असेल.

राज्य पातळीवर निवड झालेल्या प्रथम क्रमांकास ५० हजार, द्वितीय क्रमांकास ४० हजार व तृतीय क्रमांकास ३० हजाराचे बक्षीस असेल. पीक स्पर्धा योजनेत सहभागी होण्यासाठी तालुका कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा असे कळविण्यात आले आहे.

crop
Crop Competition : शेतकऱ्यांना पीक स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन; भरघोस बक्षीस जिंकण्याची संधी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com