Nashik Crop Insurance: जिल्ह्यातील साडेतीन लाख शेतकऱ्यांचा ‘पीकविमा’! 3 ऑगस्टपर्यंत मुदतवाढ

crop insurance
crop insuranceesakal

Nashik Crop Insurance : शासनाने जाहीर केलेल्या एक रुपयात पीकविमा योजनेला जिल्ह्यात उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून, तीन लाख ४० हजार ५६२ शेतकऱ्यांनी या योजनेत सहभाग घेतला आहे.

अर्ज करण्यासाठी ३ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ मिळाल्याने अर्जदारांची संख्या वाढणार आहे. (Crop insurance of three half lakh farmers in district Extension till August 3 nashik)

एक रुपयात पीकविमा योजनेत अधिकाधिक शेतकऱ्‍यांनी भाग घ्यावा म्हणून कृषी विभाग प्रयत्नशील आहे. पीकविमा नोंदणी ऑनलाइन असल्याने शेतकऱ्‍यांना त्यासाठी थोड्याफार प्रमाणात पैसे मोजावे लागतात.

नोंदणी करताना कागदपत्रे अपलोड करण्यास वेळ लागतो. पीकविमा भरण्याचे सर्वरच डाउन झाल्याने शेतकऱ्यांना नोंदणी करताना अडचणी निर्माण झाली होती. यानंतर राज्य सरकारने तीन दिवस मुदतवाढ दिली आहे.

३० जुलैपर्यंत जिल्ह्यातील तीन लाख ४० हजार ५६२ शेतकऱ्यांनी दोन लाख २७ हजार २६८ हेक्टरचा विमा उतरविला आहे. त्यांच्यासाठी विमा कंपनीला साधारणत: १०५५ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. गेल्या वर्षी जिल्ह्यातील एक लाख ६५ हजार शेतकऱ्यांनी या योजनेत सहभाग घेतला होता. यंदा ही संख्या दुप्पट झाली आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

crop insurance
Sambhaji Bhide Controversy: संभाजी भिडेंवर गुन्हा दाखल करत अटकेची NCP, समता परिषदेची मागणी

पाच हजार २१८ : कर्जदार शेतकऱ्यांचे अर्ज

तीन लाख २५ हजार ३४४ : बिगरकर्जदार शेतकऱ्यांचे अर्ज

तीन लाख ३० हजार ५६२ : एकूण शेतकऱ्यांचे अर्ज

दोन लाख २७ हजार २६८ : एकूण संरक्षित हेक्टर क्षेत्र

एक हजार ५५ : कोटी रुपये विमा संरक्षित रक्कम

"जिल्ह्यातील ज्या शेतकऱ्यांनी अद्याप या योजनेत सहभाग घेतलेला नसेल त्यांनी वाढीव मुदतीचा लाभ घ्यावा. अवघ्या एक रुपयात पीकविमा संरक्षण मिळत असल्याने शेतकऱ्यांना निश्चितपणे फायदा मिळेल." - कैलास शिरसाट, जिल्हा कृषी विकास अधिकारी, नाशिक

crop insurance
Success Story: रोबोटीक्स वर्ल्ड चॅम्पियनमध्ये चमकले चिमुकले!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com