esakal | Nashik Unlock : शहरात खरेदीसाठी नागरिक रस्त्यांवर; गर्दीमुळे जागोजागी वाहतुकीची कोंडी
sakal

बोलून बातमी शोधा

parking on bridge

सकाळपासून दुपारी चारपर्यंत व्यवसायांना परवानगी मिळाल्याने खरेदीसाठी शहरासह पंचवटीत मोठी गर्दी उसळत आहे. त्यामुळे ठिकठिकाणी वाहतूक कोंडीसह अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.

नाशिक शहरात सर्वच भागात गर्दी, जागोजागी वाहतुकीची कोंडी

sakal_logo
By
दत्ता जाधव

पंचवटी : कोरोना संसर्गात (Corona virus) नाशिकचा तिसऱ्या टप्प्यात समावेश झाल्याने अवघे नाशिककर खरेदीसाठी बाहेर पडले आहे. त्यातच सकाळपासून दुपारी चारपर्यंत व्यवसायांना परवानगी मिळाल्याने खरेदीसाठी शहरासह पंचवटीत मोठी गर्दी उसळत आहे. त्यामुळे ठिकठिकाणी वाहतूक कोंडीसह अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. त्यातच चारचाकी वाहने मोठ्या प्रमाणावर रस्त्यावर आल्याने वाहतुकीचा व पार्किंगचा प्रश्‍न जटिल बनला आहे. (Crowd of citizens for shopping in Nashik city causes traffic jam)

शहराच्या सर्वच भागात मोठी गर्दी, वाहतुकीची कोंडी

शहरात अधिकृत पार्किंगची ठिकाणे अतिशय कमी असल्याने शुक्रवारी (ता.११) अहिल्यादेवी होळकर पुलावर पार्किंगच्या वाहनांच्या अक्षरशः रांगा लागल्या होत्या. जिल्हा प्रशासनाने सकाळी सात ते दुपारी चारपर्यंत सर्वच प्रकारच्या व्यावसायिकांना व्यवसायासाठी परवानगी दिली आहे. त्यामुळे शहराच्या सर्वच भागात मोठी गर्दी व वाहतुकीची कोंडी अनुभवण्यास मिळत आहे. शहराची मुख्य बाजारपेठ असलेल्या रविवार पेठ, शालिमार, मेनरोड या भागात पाय ठेवायलाही जागा नसताना एरवी वर्दळ नसलेल्या पंचवटीतील विविध भागातही वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागत आहे.

हेही वाचा: शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था ‘मॉडेल आयटीआय’

परिसरात वाहनांसाठी प्रशस्त पार्किंग नाही

शहराची मुख्य व्यापारी पेठ असलेल्या रविवार पेठ भागात मोठ्या प्रमाणावर किराणाची होलसेल व किरकोळ विक्रीची दुकाने आहेत. त्यामुळे याभागात कायमच मोठी गर्दी होऊन वाहतूक कोंडी होते. एकतर या परिसरात दुचाकींसह चारचाकी वाहनांसाठी प्रशस्त पार्किंग नाही. त्यामुळे आज या भागात खरेदीसाठी येणाऱ्यांनी चक्क अहिल्यादेवी होळकर पुलावर चारचाकी वाहने उभी करत पायी जाऊन खरेदीला प्राधान्य दिले. अर्थात यात परिसरातील व्यावसायिकांची वाहने होती. परंतु खरेदीसाठी येणाऱ्यानींही पुलावरच पार्किंगला पसंती दिल्याने सकाळपासून ते रात्री उशिरापर्यंत पुलावर मोठ्या प्रमाणावर वाहने पार्क करण्यात आली होती.

गाडगे महाराज पुलावरही पार्किंग

कधीकाळी मोजकीच दुकाने असलेला दिल्ली दरवाजा परिसरात अलीकडे कपड्याची दुकाने मोठ्या प्रमाणावर लागली आहेत. या ठिकाणी ड्रेस मटेरिअल ग्राहकांना परवडेल, अशा दरात उपलब्ध होत असल्याने दिल्ली दरवाजा परिसर ‘क्लॉथ हब’ बनला आहे. हा रस्ता अरुंद असल्याने वाहतुकीची समस्या कायमच भेडसावते. त्यामुळे येथील व्यावसायिकांना शहरात खदेरीसाठी जाणारे अनेकजण चक्क गाडगे महाराज पुलावरच चारचाकी वाहने पार्क करतात. त्यामुळे या पुलाच्या एका बाजूला मोठ्या प्रमाणावर चारचाकी वाहने उभी केली जातात. याशिवाय गोदावरीच्या किनारीही मोठ्या प्रमाणावर वाहने पार्क केली जात आहेत.

(Vehicle parking on Ahilya Devi Holkar Bridge in Nashik)

हेही वाचा: आंतरराष्ट्रीय मॅथ ऑलिम्पियाड स्पर्धेत चमकले नाशिकचे विद्यार्थी