esakal | नाशिकच्या ‘मॉडेल आयटीआय’ला मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता; 'आयएमसी' करणार अंमलबजावणी
sakal

बोलून बातमी शोधा

model iti

शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था ‘मॉडेल आयटीआय’

sakal_logo
By
प्रशांत कोतकर

नाशिक : येथील आदर्श औद्योगिक प्रशिक्षण संस्थेस मॉडेल आयटीआय करण्यास गुरुवारी (ता.१०) झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. यासाठी केंद्र शासनाने ८.९९ कोटीच्या प्रकल्प किमतीस मान्यता दिली आहे. यात केंद्र व राज्याचा हिस्सा ७०ः३० असा आहे. जागतिक बँक सहाय्यित स्ट्रीव्ह (Strive) प्रकल्पांतर्गत संस्थेचा समावेश करण्यात आला आहे. स्ट्रीव्ह प्रकल्पांतर्गत स्थापन केलेली व सोसाईटी रजिस्ट्रेशन ॲक्ट अंतर्गत नोंदणी करण्यात आलेली आयएमसी सोसाईटी या योजनेची अंमलबजावणी करणार आहे. ‘आयएमसी’ला सर्व व्यवसायाच्या उपलब्ध जागेच्या २० टक्के जागांवर प्रवेश अधिकार असतील.

स्थानिक उद्योगधंद्यांच्या मागणीनुसार औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधून देण्यात येणाऱ्या व्यवसाय प्रशिक्षणाची गुणवत्तावाढ करण्यासाठी तसेच प्रशिक्षणाचा दर्जा उत्कृष्ट होण्यासाठी राज्यातील किमान एका विद्यमान शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचा ‘मॉडेल आयटीआय’ म्हणून दर्जावाढ करण्याचा विषय मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चेत आला. यात नाशिकच्या शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेची दर्जावाढ करीत मॉडेल आयटीआय म्हणून मान्यता देण्यात आली. ही मॉडेल आयटीआय औद्योगिक प्रशिक्षण संस्था औद्योगिक क्षेत्रात सर्वोत्कृष्ट कामगिरी करणारी, उच्च दर्जाचे प्रशिक्षण देणारी संस्था असेल. या संस्थेने योजनेंतर्गत केलेल्या आदर्श कामगिरीचे अनुकरण राज्यातील इतर औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये करणे अपेक्षित आहे.

हेही वाचा: नाशिकमध्ये आता दुसरा 'मॅग्नाइट मॅन'!बघण्यासाठी गर्दी

मागणीनुसार मनुष्यबळ

ही औद्योगिक प्रशिक्षण संस्था स्थानिक उद्योगधंद्याच्या मागणीनुसार कौशल्ययुक्त मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यासाठी प्रशिक्षणामध्ये उत्कृष्ट कामगिरी करणारे केंद्र म्हणून काम करील. स्थानिक उद्योगधंद्यांना अपेक्षित असलेली कुशल मनुष्यबळाची मागणी विचारात घेणे, यासाठीचे आवश्यक ते प्रशिक्षण कार्यक्रम घेणे, यातील पायाभूत सुविधांची यादृष्टीने दर्जोन्नती करणे, ग्रंथालय, वर्कशॉप, संगणक लॅब, माहिती तंत्रज्ञान सुविधांची दर्जोन्नती, तेथील स्वच्छता, सुरक्षितता आणि दर्जावाढ याकडे लक्ष देणे, पर्यवेक्षकाच्या रिक्त जागा भरणे, प्रशिक्षित मनुष्यबळाला नोकरी मिळवून देण्यासाठी सेलची स्थापना करणे, यासाठी स्वतंत्र अधिकाऱ्याची नियुक्ती करणे, कालबाह्य व्यवसाय बदलणे, अशा वेगवेगळ्या महत्त्वाच्या कामांची पूर्तता या मॉडेल आयटीआयकडून अपेक्षित आहे.

हेही वाचा: भीषण! एकमेकांवर आदळून नऊ वाहने अपघातग्रस्त