
संगमेश्वर (जि. नाशिक) : गेल्या अनेक वर्षापासून सर्वच बॅंकेत ऑनलाईन व्यवहार सुरू झाले. मोबाईलच्या माध्यमातून व्यवहार होऊ लागले. भारतीय स्टेट बँकेच्या तीन शाखा असूनही सर्वसामान्य जनतेची व बॅंक ग्राहकांची गर्दी मालेगावात कमी होत नाही. सर्वाधिक जुन्या खातेदारांचे प्राधान्य स्टेट बँकेलाच आहे. (crowd outside SBI in Malegaon Online Banking transactions people in queue nashik news)
ऑनलाईन यंत्रणा असली तरी बॅंकेच्या अनेक बाबी प्रत्यक्ष कराव्या लागतात. त्यामुळे दररोज सकाळी साडेदहा ते दीड दरम्यानची रांग ही नित्याचीच झाली आहे. पासबुकला बारकोड लावणे, खात्याचे केवायसी, नवीन चेक पुस्तक मागणी, मोबाईल बँकिंग सुविधा अर्ज, बॅंक पासबुक बदलणे, पासबुक व्यवहार नोंदवून घेणे, एटीएम मागणी करणे या सोयी- सुविधांसाठी स्वतंत्र खिडकी असून, याच अंतर्गत जनधन खातेदारांची संख्या मोठ्या प्रमाणावर असल्याने इतर ग्राहकांना तासन्तास उभे रहावे लागते. जमा करून घेतलेल्या सर्व अर्जांचा निपटारा त्याच दिवशी करण्यात येतो, असे बॅंक शाखाधिकारी शाहबाज शेख यांनी सांगितले.
शहराची वाढत्या लोकसंख्येच्या प्रमाणात बॅंकींग सेवेसाठी कॅम्प भागातील एकमेव बॅंकेवर ग्राहकांना विसंबून रहावे लागत होते. वाढत्या खातेदारांचे प्रमाण पाहता सटाणा नाका परिसरातील नागरिकांसाठी बारा वर्षापासून नवीन शाखा सुरू झाली.
काही प्रमाणात दिलासा मिळाला. मात्र, शहर व परिसरातील कर्मचारी, शेतकरी, व्यापाऱ्यांचेही खाते स्टेट बँकेत असल्याने शासनाच्या योजना, कृषि कर्ज, सॅलरी अकाऊंट धारकांची पसंती मोठ्या प्रमाणात वाढली. चार वर्षापासून छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरात एक नवीन शाखा सुरू झाली आहे.
शेतकरी, कर्जदार प्रकरणांचा निपटारा, अनेकदा कागदपत्रांच्या पूर्ततेअभावी रखडल्याने नाराजी संभवते. मोठ्या प्रमाणावर खातेदारांना ऑनलाईन बॅंकीग सुविधा, योनो ॲप, मोबाईल बॅंकींग वापरण्यात अडचणी येत असल्याने ॲन्ड्रॉइड मोबाईल नसलेल्या ग्राहकांना समक्ष सेवा हाच पर्याय असल्याने या अडचणी येतात, असे बॅंक अधिकाऱ्यांनी सांगितले
दृष्टिक्षेपात स्टेट बॅंक
बॅंकेचे खातेदार- १८७०००
कर्जदार खातेदार- ३००००
पेन्शनर खातेदार संख्या- १८००
रोज येणारी चलन संख्या- ४० ते ५०
बॅंक कर्मचारी व अधिकारी मंजूर पदे- १४
कार्यरत अधिकारी, कर्मचारी- १४
सुरक्षा कर्मचारी- ७
"बॅंकेच्या अंतर्गत बदल करून ग्राहकांना सर्व सेवा देण्यासाठी बांधिलकी आहे. मोबाईल बँकिंग, योनो ॲप, क्रेडिट कार्ड, इन्शुरन्स यासाठी स्वतंत्र व्यवस्था. सर्व कर्ज प्रकरणांची तातडीने कार्यवाही होते. ऑनलाईन वापरात सर्वसामान्य ग्राहकांना अडचणी येतात. त्यामुळे गर्दी वाढते. तरीही ग्राहकांच्या सेवेची काळजी घेतली जाते."
- शाहबाज शेख, शाखाधिकारी, स्टेट बँक ऑफ इंडिया, मालेगाव
"बॅंकेच्या सुविधांमध्ये बदल झाला असला तरी वयोवृद्ध व महिला यांना जास्त वेळ रांगेत रहावे लागते. निवृत्त असल्याने ठिक आहे. मात्र, आमच्या वेळेची बचत होईल, गर्दी कमी होईल याकडे बॅंक प्रशासनाने लक्ष द्यावे."- चंद्रकांत दुसाने, पेन्शनर
"पगारदार खातेदारांच्या बाबतीत बॅंकेने अनेक सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. सेम डे वेतन जमा करण्याची कार्यवाही होते."
- भाऊसाहेब कापडणीस, सरचिटणीस, शिक्षक भारती, मालेगाव
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.