
रमजान ईदच्या खरेदीसाठी बाजारात गर्दी; व्यावसायिकांमध्ये उत्साह
जुने नाशिक : अलविदा रमजानला शनिवारी (ता.२३) सुरवात झाली आहे. अवघे आठ दिवसांवर रमजान ईद साजरी होणार आहे. त्यानिमित्ताने मुस्लिम बांधवांची विविध प्रकारच्या खरेदीसाठी बाजारात गर्दी होताना दिसत आहे. रमजान पर्वाच्या तिसऱ्या आणि अंतिम खंडास सुरवात झाली आहे. आठ ते नऊ दिवसात रमजान ईद (Ramzan eid) साजरी केली जाणार आहे.
मुस्लिम (Muslim) बांधवांचा सर्वात मोठा सण म्हणून रमजान ईद साजरी केली जाते. मुस्लिम बांधवांकडून महिनाभर केलेला उपवास रोजा ईदच्या दिवशी सुटत असतो. मुस्लिम बांधवांकडून मोठ्या उत्साहात ईद साजरी केली जाते. लहान्यांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वजण नवीन कपडे परिधान करत असतात. शिरखुर्मा गोड पदार्थावर रोजाचा समारोप केला जातो. त्यानिमित्ताने मुस्लिम बांधवांकडून नवीन कपडे, शिरखुर्मासाठी लागणारे पदार्थ तसेच अन्य विविध प्रकारच्या खरेदीसाठी बाजारपेठेत विशेषतः कपड्यांच्या दुकानांमध्ये मोठ्या प्रमाणावर गर्दी दिसून येत आहे. कोरोना प्रादुर्भावामुळे गेल्या दोन वर्षापासून अतिशय साध्या पद्धतीने ईद साजरी करण्यात आली. घरातल्या घरात ईद साजरी झाल्याने कुठल्या प्रकारची खरेदी होऊ शकली नाही. त्यामुळे मुस्लिम बांधवांचा व्यावसायिकांमध्ये नाराजी होती.
हेही वाचा: Nashik | एटीएमची अदलाबदली करून पैसे काढणाऱ्या सराईतास अटक
यंदा मात्र सर्वच सन उत्साहात साजरे होत आहे. रमजान ईददेखील उत्साहात साजरी होणार आहे. प्रशासनाकडून निर्बंध उठवण्यात आल्याने बाजारपेठ पूर्वीप्रमाणे सजली आहे. सणाची खरेदी करण्यासाठी नागरिकही बाजारपेठेत येत असल्याने व्यावसायिकांमध्येदेखील उत्साह दिसून येत आहे. दोन वर्षांची कसर भरून काढली जात आहेत की काय अशा प्रकारचे चित्र सध्या बाजारात दिसत आहे. आठ, नऊ वाजेच्या सुमारास बंद होणारी बाजारपेठ सणानिमित्त आणि रात्री उशिरापर्यंत सुरू राहत आहे. दुसरीकडे मुस्लिम बांधवांना रमजान ईदचे वेध लागले आहे.
हेही वाचा: Nashik | हुश्श...झालीय एकदाची बस सुरू
अलविदा रमजानला सुरवात
रमजाननिमित्त शहराच्या विविध मशिदीमध्ये तराबीची विशेष नमाज पठाण होत आहे. यात तोंडपाठ कुराण शरीफचे पठाण होत आहे. गुरुवारी (ता. २८) रोजी शब- ए- कद्र साजरी होणार आहे. या दिवसापर्यंत कुराण शरीफ पूर्णता पठण संपविले जाते. रमजानच्या अंतिम खंडात शब- ए- कद्र आणि रमजान ईद येत असल्याने अलविदा रमजानला प्रारंभ झाला आहे.
Web Title: Crowds In The Market For Ramadan Eid Shopping Enthusiasm Among Professionals Nashik News
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..