मासे पकडण्यासाठी गांधी तलावावर उसळली गर्दी

Gandhi Lake
Gandhi Lakeesakal

पंचवटी : गंगापूर धरणातील पाण्याच्या विसर्गानंतर गेल्या पंधरा दिवसांपासून खळाळून वाहणाऱ्या गोदापात्रातील विसर्ग आता थांबविण्यात आला आहे. त्यातच गांधी तलावाच्या मोऱ्या उघडून दिल्यामुळे या ठिकाणी मासेमारीसाठी मोठी गर्दी उसळली आहे. गेल्या आठ दहा दिवसांपासून पाण्याच्या विसर्गामुळे गोदापात्र खळाळून वाहत होते.

Gandhi Lake
...मग कशी होणार गोदावरी स्वच्छ?

परंतु आता हा विसर्ग थांबविण्यात आल्याने गांधी तलावासह अनेक कुंडे रिकामी झाली आहेत. त्यामुळे याठिकाणी मोठ्या प्रमाणावर मासे सापडत असल्याने मोठी गर्दी उसळली होती. मासे पकडण्यासाठी छोट्या मुलांसह ज्येष्ठांनीही गर्दी केली होती. यातील काहींनी मासे पकडण्यासाठी जाळ्यांचा वापर केला तर काहीजण चक्क काठी, दगड मारून मासे पकडत होते, मात्र अटकाव करण्यासाठी कोणीच नसल्याने दगड मारून मासे पकडण्याचा हा जीवघेणा खेळ दिवसभर सुरूच होता.

Gandhi Lake
नाशिक : महापालिकेच्या रडारवर गोदाघाटावरील अतिक्रमण

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com