...मग कशी होणार गोदावरी स्वच्छ?

Pollution of Godavari
Pollution of Godavariesakal

पंचवटी (जि. नाशिक) : नमामि गंगेनंतर नमामि गोदेची हाक देण्यात आलेली आहे. परंतु, प्रशासनाने वारंवार आवाहन करूनही गोदापात्रात कपडे धुण्यासह वाहनेही धुतली जात असल्याने कशी होणार गोदावरी स्वच्छ, असा प्रश्‍न सर्वसामान्य नाशिककरांनी केला आहे. गोदावरी स्वच्छतेबाबत अधूनमधून आवाज उठविला जातो, परंतु त्यात सातत्य नसल्याने गोदेचे प्रदूषण बिनदिक्कत सुरूच आहे.

एकीकडे नदीपात्रात मलजल किंवा रासायनिक पाणी सोडणाऱ्यांवर कारवाई केली जाते, दुसरीकडे उच्च न्यायालयाने आदेश देऊनही गोदापात्रात मोठ्या प्रमाणावर कपडे धुतले जात असल्याचे दिसून येते. रामकुंडाच्या खालील सर्वच कुंडात सध्या मोठ्या प्रमाणावर कपडे धुण्यासाठी गर्दी होत आहे. याशिवाय घाटालगत व्यवसाय करणारे अनेकजण थेट नदीपात्रातच कचरा टाकत असल्याने प्रदूषणात भरच पडत आहे.

सुरक्षारक्षक गायब

गोदावरी प्रदूषणाचा प्रश्‍न सामाजिक कार्यकर्ते देवांग जानी, निशिकांत पगारे आदींनी उपस्थित केल्यावर जुजबी उपचार पार पडले, मात्र तरीही प्रदूषण सुरूच असल्याने उच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावण्यात आले. न्यायालयानेही यात हस्तक्षेप करत प्रदूषणविरोधात कौल दिला. त्यामुळे रामकुंडापासून टाळकुटेश्‍वर मंदिरापर्यंत चोवीस तास सुरक्षारक्षकांची नियुक्ती करण्यात आली होती. कालांतराने ठेकेदारीवर घेतलेले हे सुरक्षारक्षक गायब झाले.

Pollution of Godavari
नाशिक : महापालिकेच्या रडारवर गोदाघाटावरील अतिक्रमण

निर्माल्य नदीपात्रातच

महापालिका प्रशासनाने वारंवार आवाहन करूनही तसेच नदीपात्रालगत निर्माल्य कलश ठेवूनही अनेकजण थेट नदीपात्रातच निर्माल्य टाकतात. यात स्वतःला सुसंस्कृत म्हणवून घेणारे अनेकजण थेट पुलावरून नदीपात्रात निर्माल्य टाकतात. त्यामुळे नदीचे मोठ्या प्रमाणावर प्रदूषण होते. दुसरीकडे श्राद्धादी विधीसाठी आलेले अनेकजण विधीनंतर नदीपात्रातच कपडे सोडून देतात, त्यामुळे नदीपात्राला गटारीचे स्वरूप प्राप्त होते.

Pollution of Godavari
गोदाघाटाला चौपाटीचा फिल; स्नानासाठी गर्दी

देवमामलेदार यशवंतराव महाराज पटांगणावरील नदीपात्रालगतच्या पायऱ्या व काही छोटी मंदिरे मध्यंतरी काढून टाकण्यात आली. परंतु मोठा विरोध झाल्याने हे काम बंद पडले. आता महिना झाला तरी अद्यापही त्या ठिकाणचे मटेरिअल तसेच पडून आहे. त्यामुळे या भागाला बलाक स्वरूप प्राप्त झाले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com