येसगाव- हवामान विभाग किंवा शास्त्रोक्त पध्दत नसतांना पारंपरिक पशु-पक्ष्यांच्या निरीक्षणावरुन पावसाचा अंदाज बांधला जात. जी पध्दत आजही ग्रामीण भागात प्रचलित आहे. अनेक गृहीत जुन्या पद्धतीवरून धरली जातात. गाव व परिसरात कावळ्यांच्या घरटे बांधणीला वेग दिला आहे. घरट्यांच्या उंचीवरून पावसाचा अंदाज लावण्याची परंपरा अनेक ठिकाणी आहे.