Diwali Festival : अभ्यंगस्नानासाठी सुगंधित उटण्याची रेलचेल; शरीर शुद्धतेसाठी स्नानाला महत्त्व

Diwali Festival 2022 Ubtan
Diwali Festival 2022 Ubtanesakal

नाशिक : दिवाळीच्या अभ्यंगस्नानासाठी सुगंधित तेल अन उटण्यानी सजलेल्या बाजारपेठेत पारंपारिक आयुर्वेदिक उटण्याची रेलचेल आहे. आर्थिकस्तरावर उटण्याची उलाढालीची कोट्यवधींची उड्डाणे नसली, तरीही रोजगारनिर्मितीला चालना मिळाली आहे.
भारतीय परंपरेत शुद्धतेला फार महत्त्व असून शरीर शुद्धीसाठी स्नानाला महत्त्व आहे. कोणतीही पूजा, धार्मिक विधीच्या आधी स्नानाला प्राधान्य दिले जाते. त्याचबरोबर धर्मशास्त्रात वेळेनुसार स्नानाचे फळ सांगितले आहे.

ब्रह्म मुहूर्तावरील पहाटे ४ ते ५ वेळेतील स्नानाला सर्वश्रेष्ठ मानले जाते. त्यानंतर सूर्योदयापूर्वी ५ से ६ दरम्यानच्या स्नानाला देव स्नान म्हटले जाते. सकाळी ६ से ८ मधील मानव स्नान म्हणून संबोधले जाते, तर सकाळी ८ नंतरचे स्नान निषिद्ध मानले आहे. हे झाले रोजचे स्नान. दिवाळी सर्वात मोठा सण असलेल्या दिवाळीत अभ्यंग स्नानाचे महत्त्व आहे. (culture of scented Ubtan for bathing Importance of body cleanliness in Diwali Festival Nashik Latest Marathi News)

ऋतुमानानुसार सण -व्रतवैकल्ये

ऋषिमुनींनी ऋतुमानानुसार सण, व्रतवैकल्ये यांची निर्मिती करून वैज्ञानिक पद्धतीने जीवनशैली राखण्यासाठी काही परंपरा, नियम तयार केले आहेत. त्याच पद्धतीने दिवाळीला अभ्यंगस्नान सांगितले आहे. दिवाळी हा सण वर्षा व हेमंत ऋतू यांच्या संक्रमण काळात येतो. पावसाळा संपून हिवाळा सुरू होण्यापूर्वी दिवाळी येत असल्याने हिवाळा हा आपल्या शरीराचे आरोग्य चांगले ठेवण्यासाठी, शरीराचे पोषण करण्यासाठीचा ऋतू असल्याने हिवाळ्यात शरीराची कशी काळजी घ्यावी याची सुरवात अभ्यंगस्नानाने होते.

अभ्यंगस्नानाला आयुर्वेदिक

अभ्यंगस्नानाला आयुर्वेदीक महत्त्व आहे. अभ्यंगस्नान म्हणजे अभ्यंग तेल, उटणे लावून स्नान करणे. हे नरक चतुर्दशीच्या दिवशी पहाटे उठून सूर्योदयापूर्वी केले जाते. दिवाळी सणातील अभ्यंगस्नानाला भारतीय संस्कृतीत विशेष महत्त्व दिले गेले आहे. मंजिष्ठा, वचा, चंदन, सारीवा, नागरमोथा इत्यादी सुगंधी पदार्थांपासून केलेले एक मिश्रणातून सुगंधित उटणे केले जाते. तेल आणि उटण्याने शरीराची मालिश केल्याने कांती उजळते.

अभ्यंगस्नानामुळे रुक्ष त्वचेचे थर काढून मूळ त्वचेतील स्निग्धता वाढून मुलायम होत त्वचा चमकदार होते. केसाच्या मुळाशी मसाज करताना शरीरातील वात आणि कफ प्रवृत्ती संतुलनाला मदत होते. आयुर्वेदानुसार अभ्यंगस्नानात आधी भल्या पहाटे गरम पाणी पिण्याची पध्दत आहे. अभ्यंग तेलाच्या मसाजमुळे हाडांच्या बळकटीसाठी उपयुक्त मानले जाते.

Diwali Festival 2022 Ubtan
Diwali Festival 2022 : पर्यावरण पूरक आकाश कंदीलाची विदेश वारी!

मानसिक समाधानाचे स्नान

ॐ अपवित्रः पवित्रो वा सर्वावस्थां गतोऽपिवा ।।

यः स्मरेत्पुण्डरीकाक्षं स बाह्यभ्यन्तरः शुचिः ॥

अतिनीलघनश्यामं नलिनायतलोचनम्।

स्मरामि पुण्डरीकाक्षं तेन स्नातो भवाम्यहम्ं।।

अर्थात, अपवित्र असो अथवा पवित्र असो अथवा सर्व अवस्थेत असो. जो कमळानेत्र असलेल्या भगवंताचे स्मरण करतो, तो बाह्य आणि आंतरिक दोन्ही प्रकारे शुद्ध होतो. तो अतिशय निळा आणि गडद होता आणि त्याचे डोळे कमळासारखे होतात. मला कमळाचे डोळे असलेल्या भगवंताचे स्मरण होते आणि मी त्यात स्नान केले आहे. असे म्हणत मानसिक स्नान केले जाते.

स्नानाचे प्रकार

- मंत्र स्नान - मंत्रोच्चारात से स्नान करणे

- अग्नि स्नान - शरीरावर भस्म लावून स्नान

- भौम स्नान - शरीरावर माती लावून स्नान

- वायव्य स्नान - गायीच्या खुराच्या धुळीचे स्नान

- वरूण स्नान - पावसाच्या पाण्यात स्नान

- दिव्य स्नान - सूर्याची किरण अंगावर स्नान

- पंचगव्य स्नान - गायीच्या शेण लावून स्नान

"दिवाळीला एक दिवस अभ्यंगस्नान करणे एवढ्या पुरता यामागचा हेतू नसून या दिवसापासून अभ्यंगस्नानास प्रारंभ करावा, असे अपेक्षित आहे. अभ्यंगस्नान करताना डोके, मान, चेहेरा, हात, खांदे-छाती, पाठ, पाट, पायाचे पंजे या क्रमाने सगळ्या शरीराची तेलाने मसाज केली जाते. शरीराला तेल लावून सुंगधित उटणे, गुलाबपाणी, तिळाचे तेल, मुलतानी मातीच्या उपयोगाची पारंपारिक पध्दत आहे. पण याशिवाय गोदावरी तीरावर रोज नियमितपणे पंचगव्य, स्नान करणारा मोठा वर्ग आहे. त्यात, माती, पंचगव्य, सूर्यस्नानासह विविध प्रकारे शुचिर्चिभुत होणाऱ्यांची संख्या मोठी आहे." - प्रशांत गिते गव्य चिकित्सक योग शिक्षक, नाशिक

Diwali Festival 2022 Ubtan
Diwali Festival 2022 : कुरकुरीत पदार्थ लई भारी, रोजगार वृद्धीही झाली..!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com