Cumin Seed Rates Hike: भाजीला जिऱ्याचा तडका, झाला महागाईचा भडका! उत्पादनात मोठी घट झाल्याने भावात वाढ

Cumin Seed Rates Hike
Cumin Seed Rates Hikeesakal

Cumin Seed Rates Hike : महागाईचा उच्चांक कमी होण्याचे नाव घेत नाही. एकीकडे गोडेतेलाचे दर काहीसे कमी झाले असताना दुसरीकडे भाजीला चव देणारे जिरे चांगलाच भाव खात असल्याने गृहिणींचे बजेट कोलमडले आहे. (Cumin Seed Rates Hike Increase in prices due to large decrease in production nashik)

कुठल्याही नाश्ता अथवा भाजीला चव येते ती फक्त जिऱ्यांमुळेच. मात्र, सध्या हेच जिरे भाव खात आहेत. आवक घटल्याने जिरे महागले असून, दररोजच्या जेवणातील भाज्यांची फोडणी सर्वसामान्यांना परवडेनाशी झाली आहे.

दोन महिन्यांत जिऱ्याचे दर किलोमागे तब्बल दीडशे रुपयांपर्यंत वाढले आहेत. चटपटीत भाजी असो किंवा पौष्टिक वरण; रोजच्या जेवणाची चव वाढविण्यासाठी फोडणीसाठी जिरे आवश्यक असतात.

घाऊक बाजारात तूरडाळ १४५ ते १५० रुपये किलो, तर किरकोळ बाजारात १६० रुपये प्रतिकिलो या दराने विक्री होत आहे. चणाडाळ ६५, मूगडाळ ११०, मसूरडाळ ८० रुपये प्रतिकिलो या दराने विक्री होत आहे.

...असा वाढला भाव

नवीन वर्षात जिरे गगनाला भिडले. या वर्षी मार्च २०२३ मध्ये जिरे २८९ रुपये प्रतिकिलो, एप्रिल महिन्यात ३५० रुपये, मे महिन्यात ५०० रुपये, जून महिन्यात ७०० रुपये, तर जुलै महिन्यात ७५० ते ८०० रुपये प्रतिकिलोवर पोचले आहेत.

काही व्यापाऱ्यांनी केलेल्या दाव्यानुसार, थोड्याच दिवसात एक हजार रुपये किलोवर दर पोचू शकतात.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Cumin Seed Rates Hike
Coriander Rates Hike: कोथिंबिरीला मिळाला सोन्याचा भाव!

शेतकऱ्यांच्या हाती लागले सोने

राजस्थानसह इतर ठिकाणी जिऱ्याची शेती करणाऱ्या शेतकऱ्यांच्या हाती सोने लागले आहे. यंदा अनेक राज्यांत उन्हाच्या झळा बसल्या. त्यामुळे उत्पादनावर मोठा परिणाम होऊन जिरे उत्पादन घटले. परिणामी, त्याचा फटका गृहिणींना बसला.

उत्पादनच घटल्याने जिऱ्याचे भाव तीनच महिन्यांत तीन पटीने वाढले आहे. गेल्या वर्षी एक पोते २० ते २५ हजार रुपयांना मिळत होते. यंदा हा भाव ५० ते ६० हजार रुपयांवर पोचला आहे.

राजस्थान आणि गुजरातचे जिरे सर्वोत्तम

जगात राजस्थान आणि गुजरातचे जिरे भाव खाऊन जाते. गुणवत्ता आणि चवीसाठी ते ओळखले जातात. चीन आणि बांगलादेश सर्वाधिक जिरे खरेदी करतात. हवामान बदलाचा परिणाम जिऱ्यावर पडला आहे.

उत्पादनात मोठी घट आली आहे. त्यामुळे भावात मोठी वाढ झाली आहे. गेल्या वर्षी ८० ते ९० लाख पोती उत्पादन झाले होते. यंदा हे उत्पादन ५० लाख पोत्यांवर आले आहे.

प्रकार सध्याचे दर

जिरे ७५० ते ८००

तूरडाळ १५० ते १६०

मूगडाळ १०५ ते ११०

मसूरडाळ ८० ते ८५

शेंगदाणे १३० ते १४०

साबूदाणा ७५ ते ८०

साखर ४० ते ४२

गोडेतेल १०० ते ११०

मगज बी ७५० ते ८५०

"‘भाजीला जिऱ्याचा तडका, झाला महागाईचा भडका’, ‘दिसण्यात लहान; पण कार्यात महान’, असा मसाल्यातील महत्त्वाचा घटक म्हणजे जिरे. याशिवाय स्वयंपाकाला फोडणीच देता येणार नाही. जिऱ्याने महागाईचा उच्चांक गाठत कुटुंबातील आर्थिक बजेट जिरवले, असेच वाटत आहे. यावर सरकारने नक्कीच विचार करायला हवा." - प्रतिभा माळी, गृहिणी

"जिऱ्याचे भाव वाढल्यामुळे सर्वसामान्य व्यापारीवर्गाला त्याचा खूप फटका बसला आहे. जिरे हा मसाल्याचा अविभाज्य घटक आहे. जिरे दरवाढीमुळे आमच्यासारख्या पॅकर्सचे गणित बिघडले आहे, तरी याची दखल घ्यावी." - श्रीनिवास सोनजे, मसाले व्यापारी, पिंपळगाव बसवंत

Cumin Seed Rates Hike
Nashik News: खते- बियाण्यांत अडकले 100 कोटी! कृषी निविष्ठाविक्रेते चिंतेत, पाऊस नसल्याने व्यवहार ठप्प

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com