esakal | नाशिकच्या सिक्युरिटी प्रेसच्या 'सिक्युरिटी'ला छेद; कारखान्यातून 5 लाखांच्या नोटा गायब
sakal

बोलून बातमी शोधा

nashik press

नाशिकच्या सिक्युरिटी प्रेसच्या सुरक्षेला छेद; 5 लाख गायब

sakal_logo
By
विनोद बेदरकर

नाशिक : चलार्थपत्र मुद्रणालयात देशाचे चलन छापले जाते. वर्षासाठी दोन ते अडीच हजार दशलक्ष नोटा छपाई करणाऱ्या या कारखान्याने नोट छपाईचे अनेक उच्चांक केले आहेत. देशातील नोटाबंदीनंतर उद्‌भवलेल्या चलनटंचाईच्या काळात दिवसरात्र काम करून ज्या कारखान्याने देशाची कौतुकाची शाबासकी मिळविली त्याच मुद्रणालयात चोरीचा धक्कादायक प्रकार पुढे आल्याने प्रेसच्या लौकिकाला धक्का बसला आहे. (currencies-disappears-from-Nashik-security-press-marathi-news)

प्रेसच्या लौकिकाला धक्का, पोलिस विभागाचेही मौन

देशाच्या चलनी नोटा छपाईच्या चलार्थपत्र मुद्रणालयातील सुरक्षाव्यवस्था भेदून त्यातून सुमारे पाच लाखांच्या नोटा गायब केल्याचा धक्कादायक प्रकार उजेडात आला आहे. या घटनेने मुद्रणालयात खळबळ उडाली आहे. चलार्थपत्र मुद्रणालयातील नोटा छपाईच्या कारखान्यातील या गहाळ नोटांबाबत काही दिवसांपासून गोपनीयरीत्या चौकशी सुरू असलेल्या या प्रकारणी सोमवारी (ता. १२) मुद्रणालयातील अधिकारी उपनगर पोलिस ठाण्यात पोचले तेव्हा वाचा फुटली. यात उशिरापर्यत पोलिसांत गुन्हा दाखल झालेला नव्हता. दरम्यान, हा विषय आर्थिक सुरक्षेशी संबंधित असल्याने मुद्रणालय प्रशासकीय यंत्रणेसोबत पोलिस विभागानेही मौन बाळगले आहे.

हेही वाचा: मंत्रीपद मिळूनही डॉ. भारती पवारांचा सोज्वळपणा कायम

हेही वाचा: पिंपळगावला आढळला दोनशे वर्षांपूर्वीचा घाट

loading image