नाशिक: महाविद्यालयीन शिक्षण घेणाऱ्या युवतीला दोन बँक खाते उघडण्यास लावून सायबर भामट्यांनी फ्रॉडच्या माध्यमातून त्यावर १५ लाख जमा केले. त्यावरून पाच लाख काढण्यात आल्याने बँकेला संशयास्पद व्यवहाराची शक्यता वाटली आणि खाते फ्रीज केले. याप्रकरणी सायबर भामट्यांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.