नाशिक: सोशलमीडियावरील अवघ्या दोन महिन्यांच्या मैत्रीतून सायबर भामट्याने शहरातील एका विवाहितेला तब्बल १६ लाख ३५ हजार रुपयांचा गंडा घातला आहे. सोशलमीडियावरील अनोळखी व्यक्तीशी आर्थिक व्यवहार करताना दक्षता बाळगण्याचे आवाहन शहर सायबर पोलिसांनी केले असून, याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.