Crime
sakal
युवतीचे एका युवकाशी प्रेमसंबंध असतानाच, त्याचे दुसरीशी प्रेमसंबंध जुळले. त्यामुळे आपल्या प्रियकराला पुन्हा आपल्याकडे आणण्यासाठी त्या युवतीने ऑनलाइन ‘वशीकरण’ करणाऱ्या भोंदूबाबाशी संपर्क साधला. त्याने त्या युवतीला लाखो रुपयांना गंडा घातला. हे प्रकरण नाशिक सायबर पोलिसांकडे आले असता तत्कालीन वरिष्ठ पोलिस निरीक्षक देवराज बोरसे यांनी या ऑनलाइन बाबाला अडकविण्यासाठी एखाद्या चित्रपटाला साजेल, असा ऑनलाइन सापळा रचला. एरवी आतापर्यंत अनेकांना आपल्या जाळ्यात अडकविणारा भोंदूबाबाच अखेर सायबर पोलिसांच्या ‘माया’जालात अडकला.