Ashadhi Cycle Wari : सायकल रॅलीतून देणार पर्यावरण रक्षणाचा संदेश; लासलगावहून रॅली पंढरपूरसाठी रवाना

Members participating in the cycle rally.
Members participating in the cycle rally. esakal

Ashadhi Cycle Wari : येथील सायकलिंग असोसिएशनतर्फे सलग चौथ्या वर्षी लासलगाव ते पंढरपूर सायकल रॅली काढण्यात आली असून, या रॅलीद्वारे पर्यावरण पूरक संदेश दिले जाणार आहेत. (cycle wari left for Pandharpur from Lasalgaon nashik news)

असोसिएशनचे २० सदस्य ३५२ किलोमीटर अंतर तीन दिवसांत पूर्ण करणार असून, रॅलीत पर्यावरण बचावच्या संदेशासह ‘Live Green, Love-Green, Think-Green’ हा प्रमुख संदेश दिला जाणार आहे.

गुरुवारी (ता. १५) सायंकाळी साडेपाचला येथील दत्त मंदिरात गणपती आरती व नारळ फोडून रॅलीस सुरवात झाली. लासलगाव स्विमिंग ग्रुप व लासलगाव डॉक्टर्स असोसिएशनतर्फे रॅलीतील सदस्यांचा सत्कार करण्यात आला.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Members participating in the cycle rally.
Ashadi Wari 2023 : सोपानकाकांच्या नगरीत वैष्णवांची मांदियाळी; ज्ञानेश्‍वर माऊलींच्या दर्शनासाठी मोठी गर्दी

संतोष पलोड, राजेंद्र राणा, मुकुंद होळकर, डॉ. कैलास पाटील, गुणवंत होळकर, डॉ. भाऊसाहेब रायते, अरुण भांबारे, नटवर डागा, डॉ. प्रणव माठा, डॉ. संगीता सुरसे, अजय अग्रवाल, सागर थोरात, डॉ. युवराज पाटील, अनिल गवळी, डॉ. सुशांत ठोंबरे, डॉ. चारुदत्त अहिरे, जय राणा, विनोद पोटे, युवराज अहिरे, श्री. धाकराव, श्री. कदम, विलास चव्हाणके यांनी या वेळी शुभेच्छा दिल्या. डॉ. अनिल बोराडे यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. अनिल ठाकरे यांनी आभार मानले.

"सायकलिंग असोसिएशनतर्फे सलग चौथ्या वर्षी लासलगाव ते पंढरपूर सायकल वारी केली जात आहे. यात प्रामुख्याने पर्यावरण बचाव व जास्तीत जास्त झाडे लावण्याचा संदेश गावोगावी दिला जातो. यामुळे प्रामुख्याने पर्यावरण बचाव करण्यास मदत होते." -अनिल ब्रह्मेचा, अध्यक्ष, लासलगाव सायकलिंग असोसिएशन

"लासलगाव ते पंढरपूर सायकलने वारी करण्याचे हे माझे दुसरे वर्ष आहे. यातून जीवनात खूप सकारात्मक दृष्टिकोन निर्माण होतो. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी ग्रुपतर्फे विशेष प्रयत्न केले जातात." -सुनील ठोंबरे, सदस्य, लासलगाव सायकलिंग असोसिएशन

Members participating in the cycle rally.
Sant Nivruttinath Palkhi : वैष्णवांच्या अलोट गर्दीत नगरला रंगला संत निवृत्तिनाथांचा संजीवन समाधी सोहळा!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com