Sant Nivruttinath Palkhi : वैष्णवांच्या अलोट गर्दीत नगरला रंगला संत निवृत्तिनाथांचा संजीवन समाधी सोहळा!

Sant Nivruttinath Palakhi
Sant Nivruttinath Palakhi esakal

Sant Nivruttinath Palkhi : निवृत्तिनाथांची पालखी नगर जिल्ह्यातील डोंगरगण येथून अहमदनगर येथील हमाल पंचायत मार्केट यार्डमध्ये विसावली.

आज सकाळपासून संत निवृत्तिनाथांचा संजीवन समाधी सोहळा सुरू झाला. सकाळी ९ वाजता निवृत्तीनाथ महाराजांच्या पादुकांना मंत्रोच्चारात अभिषेक करण्यात आला. निवृत्तीनाथ संस्थान चे परंपरागत पुजारी जयंत महाराज गोसावी यांनी महापूजा केली. (Nivruttinath palkhi rested in Hamal Panchayat market yard of Ahmednagar nashik news)

यावेळी निवृत्तीनाथ संस्थानचे अध्यक्ष नीलेश महाराज गाढवे, पालखी प्रमुख हभप नारायण मुठाळ, सचिव ॲड. सोमनाथ घोटेकर, विश्वस्त अमर ठोंबरे, रामकृष्ण महाराज लहवितकर, पालखीचे मानकरी हभप मोहन महाराज बेलापूरकर, एकनाथ महाराज गोळेसर, हभप कांचनताई जगताप, विश्वस्त राहुल महाराज साळुंखे, नवनाथ महाराज गांगुर्डे, हमाल पंचायत संघाध्यक्ष अविनाश घुले, उपाध्यक्ष गोविंद सांगळे, आमदार संग्राम भय्या आदी यावेळी उपस्थित होते.

निवृत्तिनाथांचा संजीवन समाधी सोहळा दरवर्षी आषाढी वारीच्या मार्गावर नगरमध्ये करण्यात येत असतो. ती परंपरा आजही कायम आहे. ब्रह्मगिरीच्या पायथ्याशी निवृत्तिनाथांनी याच दिवशी ज्येष्ठ वद्य १२ शके १२१९ रोजी संजीवन समाधी घेतली. नाथांचा हा ७२६ वा संजीवन समाधी सोहळा त्र्यंबकेश्वर येथे आणि त्याचवेळी वारकऱ्यांच्या समवेत नगर मुक्कामी साजरा होत असतो.

नाथांच्या संजीवन समाधीला सात शतके आता उलटून गेलीत. परंतु तरीही निवृत्तिनाथांचे वारकरी संप्रदायात असणारे योगदान आणि त्यांचे सकळ संत मेळ्यात असणारे गुरुस्थान मात्र चिरंजीवी होऊन गेले आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Sant Nivruttinath Palakhi
Ashadhi Wari : वारकऱ्यांसाठी आरोग्य यंत्रणा झालीये सज्ज; वारीत अडचणी उद्भवल्यास 'इथे' साधता येणार संपर्क

निवृत्तिनाथांचे अगोदर सारी भावंडं समाधिस्थ झाली. ज्येष्ठांच्या आधी कनिष्ठांचे जाणे झाले...केले नारायणे उफराटे, असे नामदेवराय निवृत्तिनाथांच्या अंत:करणातली वेदना व्यक्त करतात.

ब्रह्मगिरी च्या पायथ्याशी मध्ययुगीन काळात असा हा संत मेळा निवृत्तिनाथांसाठी जमला होता. नामदेवांचे पुत्र नारा महादा गोंदा,विठा परीसा भागवत आदी संत मंडळींनी साश्रू नयननांनी निवृत्तिरायाला निरोप दिला. त्यांच्या समाधीवर फुले उधळली भजने म्हटली पाच दिवस हा समाधीचा सोहळा सुरू होता.

आजही तोच उत्साह वारकऱ्यांमध्ये संचारलेला दिसत होता. हभप जयंत महाराज गोसावी यांनी निवृत्तिनाथांचे चरित्र संक्षिप्त स्वरूपात उलगडून सांगितले. निवृत्तिनाथांच्या समाधीचे अभंग म्हटले. उपस्थित वारकऱ्यांनी समाधीचे अभंग संपल्यानंतर गुलाब पुष्प उधळून निवृत्तिनाथांना अभिवादन केले. त्यानंतर कीर्तनाची सांगता होऊन महाप्रसाद झाला.

Sant Nivruttinath Palakhi
Sant Nivruttinath Palkhi : अवघ्या जनालागी केला नमस्कार, उठावले भार वैष्णवांचे! पारणे फेडणारा सोहळा...

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com